आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bridegroom On Wheelchair And Girl Agree To Marriage

द रिअल लव्ह स्टोरी: व्‍हीलचेअरवर बसलेला वर आणि एमबीए झालेली वधु

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- सजलेला लग्‍नमंडप, सुंदर नवरी मुलगी, ढोल-ताशाचा गजर, घोड्यावर बसून लग्‍नमंडपाकडे येत असलेला नवरदेव, अशा प्रकारचे चित्र आपण लग्‍नसराईला नेहमी पाहतो. परंतु येथे आपल्‍याला वेगळेच चित्र पाहायला मिळेल. या लग्‍नामध्‍ये सुंदर नवरा मुलगा घोड्यावर नाही तर, चक्‍क व्हिलचेअरवर बसलेला. शरीराचा मानेखालचा पूर्णभाग लूळा पडलेला. नवरा मुलगा अपंग आहे, हे पाहता क्षणी लक्षात येईल. असे असताना देखील नवरीमुलीच्‍या चेह-यावरचा आनंद मात्र ओसंडून वाहत होता. ही मुलगी या मुलासोबत लग्‍न का करतेय ? हा प्रश्‍न लग्‍नसाठी आलेल्‍या प्रत्‍येकाला पडलेला. नवरा मुलगा अपंग असला तरी, नवरीचे मात्र 16 वर्षापासून या मुलावर अतोनात प्रेम आहे.
यांच्‍या प्रेमाला आता सोळा वर्षे पूर्ण होत आहेत. चित्रपटाच्‍या कथानकाला शोभेल अशी यांची प्रेमकथा आहे. ज्‍यांना यांची प्रेमकथा माहीत आहे, ते सर्व भावूक झाल्‍याशिवाय राहत नाहीत. मोबाईलवर रॉंग नंबर लागला, मात्र येथुनच यांचे आयुष्‍य राईट ट्रकवर आले. या प्रेमकथेची सुरूवात रॉंग नंबरपासून होते. फोनवर बोलने सुरू होते. नंतर ओळख वाढते, भेटीगाठी वाढतात आणि ख-या प्रेमाची सुरूवात होते. जात वेगळी असल्‍यामुळे सुरू झालेल्‍या अडचणींचा 'सिलसिला', राशींपर्यंत जातो. मुलीच्‍या राशीत मंगळ, त्‍यावर मार्ग काढतात तोच अचानक झालेल्‍या अपघातामुळे दोघांच्‍या आयुष्‍यातील सोळा वर्षे दु:ख आणि निराशामध्‍ये संपून जातात. 16 वर्षाच्‍या संघर्षानंरत शनिवारी या प्रेमाची जीत होते, दोघेही लग्‍नाच्‍या बंधनात आडकतात.
चला वधु-वराकडूनच ऐकू त्‍यांची प्रेम कहाणी.
रॉंग नंबर आणि प्रेमाची सुरूवात.
18 वर्षापुर्वी 1998 मध्‍ये सविता कडून एक चुकून माझ्या घरचा नंबर लागला. मी तो उचलला आणि मी काही बोलन्‍याच्‍या अगोदरच सविता म्‍हणाली कुठूण बोलत अहात. मी चेष्‍टणे म्‍हणाले ' चिडीयाघर से' अस म्‍हणाल्‍या नंतर दोघही हसलोत आणि फोन ठेऊन दिला. काही दिवसानंतर मीच न राहून फोन केला आणि आमचे बोलणे सुरू झाले. तीन महिन्‍या नंतर आम्‍ही भेटण्‍याचा निर्णय घेतला. मीत्राच्‍या घराजवळ आमची पहिली भेट झाली. या भेटी नंतर आमच्‍या जवळीक निर्माण झाली. त्‍यांनत सात वर्षे आम्‍ही बाहेरच एकमेकांना भेटत असत.
मी कंस्‍ट्रक्‍शना व्‍यवसाय सुरू केला. दोघांनी लग्‍न करण्‍याचा निर्णय घेतला. 2005 मध्‍ये लग्‍नाचा निर्णय आम्‍ही घरी कळवला. आमची जात- वेग-वेगळी असल्‍यामुळे दोघांच्‍याही घरच्‍यांनी लग्‍नाला विरोध केला. सविताचा आणि माझा मात्र निर्णय पक्का होता. दोन-तीन वर्षानंतर परिवातील सर्वांच्‍या लक्षात आले की, हे मुल काही ऐकत नाहीत. या नंतर घरच्‍यांचा विरोध मावळला आणि लग्‍नासाठी तयार झाले. सवीताच्‍या कुंडलीमध्‍ये मंगळ असल्‍यामुळे नविनच पेच निर्माण झाला. दोघांच्‍याही घरच्‍यांनी लग्‍नाला विरोध केला.
प्रेमाबद्दल सविताने काय सांगितले.
17 ऑगस्‍ट 2008 मध्‍ये गौरव आपल्‍या मित्रासोबत, महू जवळ असलेल्‍या वांचू पॉंइटला गेले होते. परत येताना त्‍यांची कार दरीमध्‍ये पडली. कारमधून गौरव यांना बाहेर काढण्‍यात आले, तेंव्‍हा त्‍यांच्‍या शरीराच्‍या अवयवची हालचाल पुर्णपणे थांबली होती. हॉस्पिटलमध्‍ये घेऊन गेल्‍यानंतर डॉक्‍टरांनी सांगितले की, स्‍पाइनल कॉडला मार लागल्‍यामुळे शरीर लूळे पडले आहे. माझ्या तर पायाखालची जमीन सरकली, परंतु मी मात्र माझ्या प्रेमात कुठेही कमी केली नाही.
गौरव यांच्‍या कुटुंबियांनी या घटनेला मात्र मलाच जबाबदार धरले. गौरव यांना भेटण्‍यासाठी त्‍यांच्या घरी गेल्‍यावर घरातील व्‍यक्‍ती भेटण्‍यासाठी मनाई करत. मी मात्र त्‍यांच्‍या घरासमोरच थांबत असे. शेवटी आम्‍ही केलेल्‍या त्‍यागाचे आणि समर्पणाचे महत्‍व घरच्‍यांच्‍या लक्षात आले आणि भेटण्‍यासाठी परवानगी मिळाली. अपघातानंतर गौरव म्‍हणाले, एखादा चांगला मुलगा पाहा व लग्‍न करून टाक. माझ्या वडीलांनी माझ्यासाठी मुलगा पाहून ठेवला. मात्र गौरव आणि मी एकमेकांना सोडून जगु शकत नाही हे दोघांच्‍याही लक्षात आले. आम्‍ही लग्‍न करण्‍याचा निर्णय घेऊन टाकला.
अगोदर केले कोर्टात लग्‍न, नंतर चढले बोहल्‍यावर
17 फेब्रुवारीला गौरव आणि सविताने कोर्टामध्‍ये लग्‍न केले. मुलाच्‍या घरच्‍यांनी मुलगा एकूलता एक असल्‍याने मोठे लग्‍न करण्‍याचा निर्णय घेतला. 22 फेब्रुवारीला साकेत क्लबमध्‍ये गौरवने सविताला मंगळसुत्र घालून सात जन्‍माची सोबती केले. या लग्‍नाला सविताचे आई-वडीलांनी येण्‍याचे टाळले, भाऊ मात्र सविताच्‍या पाठीसी खंबीरपणे उभा होता.
सविताचे अभार कोणत्‍या शब्‍दात मानावे हे आम्‍हाला समजत नाही, तिने आमच्‍यासाठी जे केले आहे, ते इतर मुलीकडून होणे शक्‍य नाही. सतीश आणि सुषमा( गौरवचे आई-वडील)
पुढील स्‍लाईडवर पाहा या प्रेमविरांच्‍या लग्‍नाची छायाचित्रे...