आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Under Construction Bridge Collapses In North Kolkata Many People Dead

कोलाकात दुर्घटना; दोन अभियंते निलंबित, मृतांची संख्या 24 वर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - कोलकात्यामधीलउड्डाणपुलाच्या दुर्घटनेमधील मृतांची संख्या 24 वर गेली आहे. शुक्रवारी या प्रकरणी दोन सरकारी अभियंत्यांना निलंबित करण्यात आले. पोलिसांनी हैदराबादेतील बांधकाम कंपनी आयव्हीआरसीएलच्या 10 अधिकाऱ्यांची कसून चौकशी केली.

पश्चिम बंगालच्या पोलिसांचे पथक शुक्रवारी हैदराबादमध्ये आले होते. त्यांनी आयव्हीआरसीएलच्या मालकांसह काही अभियंत्यांना ताब्यात घेतले. घटनेला बांधकामाचा निकृष्ट दर्जा कारणीभूत असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, घटनास्थळी शुक्रवारी देखील बचावकार्य सुरू होते. जखमींची संख्या 90 वर पोहचली तर 7 जणांची स्थिती गंभीर बनली आहे.
पूलाचे कंत्राट मिळालेल्या कंपनीचे अधिकारी म्हणत आहेत की यामागे बॉम्बब्लास्ट हे कारण असू शकते. त्या पद्धतीनेही तपास झाला पाहिजे. गुरुवारी बिल्डरने म्हटले होते, 'ही घटना दुसरे तिसरे काही नसून ईश्वरी कृत्य आहे'. दरम्यान, अशी माहिती समोर येत आहे की हैदराबास स्थित ही कंपनी आंध्रप्रदेश आणि उत्तर प्रदेशात कित्येक वर्षांपासून ब्लॅक लिस्टेड आहे. दरम्यान, अशीही माहिती आहे की महाराष्ट्रात या कंपनीचे अनेक प्रकल्प सुरु आहेत.
दोन राज्यात ब्लॅकलिस्टेड कंपनी
- कोलकात्यात उड्डाणपूल बांधणारी कंपनी IVRCL वर स्वतःच्याच राज्यात - आंध्र प्रदेशात 2009 मध्ये बंदी घालण्यात आली होती.
- कंपनीला राज्याच्या कामगार कल्याण खात्याच्या शिफारसीवरुन ऑगस्ट 2009 मध्ये ब्लॅकलिस्ट केले होते.
- फेब्रुवारी 2011 मध्ये कंपनीला उत्तर प्रदेशमधील सिंचन विभागाच्या विनंतीनंतर राज्य सरकारने ब्लॅकलिस्ट केले होते.
- IVRCL आणि SPMLया दोन कंपन्यांवर जल आणि मलनिस्सारण खात्यातील कामासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप करण्यात आला होता.
ममता बॅनर्जी सरकार घाई करत होते ?
- विरोधकांचा आरोप आहे, की सरकारला या पुलाचे काम लवकर उरकण्याची घाई झाली होती.
- मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पूलाचे उदघाटन फेब्रुवारी 2016 मध्ये होईल अशी घोषणा केली होती.
- तेव्हा पुलाचे 24 % काम बाकी होते. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होत आहे, की पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीपूर्वी पुलाचे काम पूर्ण करुन तृणमूल काँग्रेस त्याचा फायदा उचलण्याच्या तयारीत होती का ?

शुक्रवारचे अपडेट्स
- उड्डाणपूलाचे काम करणारी कंपनी IVRCL विरोधात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ममता बॅनर्जींनी दोषींना सोडले जाणार नाही, असे म्हटले आहे.
- शुक्रवारी IVRCL कंपनीच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी कोलकाता पोलिसांचे एक पथम हैदराबादला पोहोचले. त्यांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
- उड्डाणपूलाचे काम करत असलेल्या कंपनीने पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू स्पष्ट केली आहे.
- कंपनीचे लीगल अॅडव्हायजर म्हणाले, 'दूर्घटनेमुळे आम्हाला दुःख झाले आहे. पूल का पडला त्याच्या कारणांचा शोध घेतला जाईल. यात निष्काळजीपणा झालेला नाही. '
- आमच्या विरोधात एफआयआर दाखल झाल्याची अद्याप माहिती मिळालेली नसल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
- भाजपनेही पत्रकार परिषद बोलावून ममता बॅनर्जी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.
- केंद्रिय मंत्री मुख्तार अब्बास नकवी म्हणाले, 'टीएमसी सरकारने पाच वर्षात पाचही मोठे काम केले नाही.'
- कोलकाता हायकोर्टात दाखल एका याचिकेत IVRCL कंपनीचे गुणवत्ता प्रमाणपत्र आणि आर्थिक सक्षमतेची माहिती मागितली आहे.

70 टक्के बचावकार्य पूर्ण - आर्मी
- घटनास्थळी ढिगारे एवढे मोठे आहेत, की 140 टन वजनाचे क्रेनही एक गर्डर उचलू शकत नव्हते.
- गुरुवारी रात्री कोलकातामध्ये पाऊस झाला, त्यामुळे बचाव कार्यात अनेक अडचणी आल्या. ढिगारे उपसण्याचे काम सुरु आहे.
- गुरुवारी उड्डाणपूलाचा 100 मीटरपेक्षा जास्त भाग कोसळला. त्यात आतापर्यंत 24 जण ठार झाले आहेत. 90 हून अधिक जखमी आहे.
पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन व्यवस्थापन दलाने युद्ध पातळीवर मदत आणि बचावकार्य हाती घेतले आहे. भारतीय लष्कराचे 300 जवान आणि एनडीआरएफचे जवानही मदत बचावकार्यात सहभागी झाले आहेत.

प्रचंड वर्दळ, दाट लोकवस्तीचे ठिकाण
उत्तर कोलकात्यातील बडा बाजारजवळील हा भाग प्रचंड वर्दळीचा असून सर्वाधिक दाट लोकवस्तीच्या भागांपैकी एक आहे. दरम्यान, ही घटना दुसरे तिसरे काही नसून ईश्वरी कृत्य आहे, असे या उड्डाणपुलाचे बांधकाम करत असलेल्या हैदराबादच्या आयव्हीआरसीएल कंपनीने म्हटले आहे.

सात वर्षांपासून सुरु होते काम
- 24 फेब्रुवारी 2009 रोजी या 2.2 किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम 18 महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते.
- जमीन अधिगृहणामुळे कामाला उशिर झाल्याचे सांगण्यात येत आहे.
- कोलकाता मेट्रोपॉलिटिन डेव्हलपमेंट अॅथॉरिटीने (केएमडीए) उड्डाणपुलाचे कंत्राट हैदराबाद येथील IVRCL कंपनीला दिले होते.
- या आधाही या पुलाची डेडलाईन वाढविण्यात आली होती. या महिन्यात काम पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र कोलकाता पोर्ट ट्रस्टने त्यांची जमीन केएमडीएकडे हस्तांतरित केली नव्हती. त्यामुळे पुन्हा एकदा डेडलाइन वाढविण्यात आली होती.
- पुलाच्या बांधकामासंबंधीत एका इंजिनिअरने सांगितले, की 164 कोटी रुपये या पुलाचे बजेट होते. ते आतापर्यंत 250 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले.

प्रत्यक्षदर्शी म्हणाले, भूकंपासारखा झाला आवाज
- एनडीआरएफच्या दोन टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
- रेस्क्यू ऑपरेशनचा गोल्डन आवर चार ते पाच तासांचा मानला जातो.
- लष्कराचे बचाव पथकही घटनास्थळी पोहोचले आहे.
- लष्कराचे चार पथक दाखल झाले आहेत. तीन मेडिकल टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
- लष्कराच्या इंजिनिअर विभागाचीही टीम घटनास्थळी आली आहे.
- कोलकात्याकडून हावडाकडे जाणाऱ्या मार्गावर या उड्डाणपुलाचे काम सुरु होते. विवेकानंद ब्रिज असे या उड्डाणपुलाचे नाव आहे.
- पुलाचा एक भाग 12.25 वाजता कोसळला आहे. त्यावेळी तिथे शेकडो लोक होते, असे मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
- गेल्या तीन वर्षांपासून या पुलाचे काम सुरु आहे.
- एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की जेव्हा पुलाचा मोठा भाग कोसळला तेव्हा भूंकप आल्यासारखे वाटले.
- उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरु असल्याचे समोर आले आहे.

PM मोदींनी व्यक्त केली संवेदना
पंतप्रधान आज वॉशिंग्टन येथे पोहोचले आहेत. त्यांनी ट्विट करुन या उड्डाणपुल दुर्घटनेतील मृतांबद्दल संवेदना व्यक्त केली. बचाव कार्याची माहिती घेतली असल्याचेही त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.
विरोधकांचा आरोप बॅनर्जी सरकारचा निष्काळजीपणा
- सीपीएम खासदार मोहम्मद सलीम यांनी, पुलाचे काम दिवसा का सुरु होते, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
- तृणमुल काँग्रेस खासदार दिनेश त्रिवेदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यासोबतच त्याच्या निःपक्ष चौकशीची मागणी केली आहे.
- भाजप खासदार बाबुल सुप्रियो म्हणाले, उड्डाणपुलाच्या दुर्घटनेला निष्काळजीपणा जबाबदार आहे.
- दीड वर्षांपूर्वीही कोलकात्यात एका उड्डाणपुलाचा 500 मीटर भाग कोसळला होता.
- वर्ल्डकप टी-20चा अंतिम सामना रविवारी कोलकाता येथे होणार आहे.
या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधा.
1070, 033-22143526, 033-22535185, 033-22145664
पश्चिम बंगाल सरकारने कंट्रोल रुमची स्थापना केली आहे. हे आहेत क्रमांक.
1070, 033-22143526/033-22535185/033-22145664. Fax:033-22141378
पुढील स्लाइडमध्ये पाहा, या घटनेचे Exclusive फोटो आणि व्हिडिओ...