आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Brijamohanlal Munjal Come From Pakistan, World Ride On Two Wheeler

पाकमधून पायी आले, जगाला दुचाकीची सैर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना - जगातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी हीरो ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष ब्रिजमोहनलाल मुंजाल यांचे रविवारी निधन झाले. हीरो मोटोकॉर्पने गेल्या वर्षी ६६ लाख दुचाकी विकल्या. कंपनीचे मार्केट कॅप ५१ हजार कोटींचे आहे.

संपूर्णजगाला दुचाकीवरून फिरवणारे ब्रिजमोहनलाल मुंजाल फाळणीच्या वेळी पाकिस्तानमधून पायी आले होते. त्या वेळी त्यांच्याजवळ फक्त एक बॅग होती. तीत सायकलचे काही सुटे भाग होते. इतर सर्व सामान त्यांनी सीमेपलीकडे सोडले होते. ते चार भावांसह पंजाबच्या टेकचंद जिल्ह्यातील कमालिया भागातून (आता पाकिस्तानमध्ये) अमृतसरला आले होते. सुरुवातीला त्यांनी ऑर्डिनन्स फॅक्टरीत काम केले. १९५४ ला लुधियानात आले आणि सायकल चेन बनवण्याचे काम सुरू केले. दोन वर्षांनंतर पंजाब सरकारने लुधियानात सायकल बनवण्यासाठी १२ लायसन्स देण्याचे टेंडर काढले. मुंजाल यांनी आपले तीन भाऊ सत्यानंद मुंजाल, ओपी आणि दयानंद मुंजाल यांना सोबत घेऊन ते मिळवले आणि ‘हीरो सायकल’ धावू लागली.

हीरोने १९८६ मध्ये जगात सर्वात जास्त सायकली बनवण्याचा गिनीज विक्रम नोंदवला. त्याआधी १९८४ मध्ये जपानच्या होंडा ग्रुपसोबत दुचाकी प्रकल्प सुरू झाला होता. ही भागीदारी २०११ पर्यंत टिकली.

सर्वातमोठ्या प्रतिस्पर्ध्याने दिवसांपूर्वीच दिली पावती
२८ऑक्टोबरला मोहालीत आयोजित पंजाब इन्व्हेस्टर्स समिटमध्ये सहभागी होण्यासाठी बजाज ग्रुपचे अध्यक्ष राहुल बजाज आले होते. ते म्हणाले होते,‘माझे सर्वात मोठे प्रतिस्पर्धी आणि जगातील सर्वात मोठ्या दुचाकी कंपनीचे मालक येथे बसले आहेत. ब्रिजमोहन मुंजाल यांना मी तीन दशकांपासून ओळखतो. ऑटोमोबाइलच्या जगात मी त्यांना गुरू मानतो. मुंजाल यांनी आपले कर्मचारी, डिस्ट्रिब्युटर्सशी व्यवसायाव्यतिरिक्त वैयक्तिक संबंध प्रस्थापित केले. त्यांनी हीरोला शिखरावर नेले.’

पाच सिद्धांतांआधारे मिळवले यश
ब्रिजमोहनमुंजाल यांनी सिद्धांतांआधारे यश मिळवले. ते आहेत -डिफरन्शिएटर, ग्राउंड कनेक्ट, फोकस ऑन गोल्स, रिस्पेक्ट अँड रिकग्निशन आणि अँबिशन.