आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bring Boat For People In Kota Because Of Heavy Rain

PHOTO- राजस्थानमध्ये पाणीच पाणी; मगरींच्या भीतीने युवक अडकला 2 तास झाडावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोटा/जयपूर - संपूर्ण उन्हाळा उन्हाची लाही लाही सहन केल्यानंतर राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात सध्या पावसाने धुमाकुळ घातला आहे. सोमवारी तर मुसळधार पावसामुळे अनेकांना घरातून बाहेर पडणे अवघड झाले. जयपूर, जोधपूर, उदयपूर आणि कोटा समवेत राज्यातील अनेक शहरांमध्ये सकाळी सुरू झालेल्या या पावसाने दिवसभर ठाण मांडले. राज्यावर सर्वत्र काळे ढग जमले होते. भर दुपारी या ढगांमुळे संध्याकाळ झाल्याचा भास निर्माण झाला होता. कोटाच्या अनेक वसाहतींमध्ये पाणी घरात घुसल्याने लोकांना जीव वाचवण्यासाठी बोटी चालवाव्या लागल्या. यामध्ये सर्वात जास्त पाऊस जमवारामगडमध्ये झाला. येथे 73 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. याशिवाय चौमुमध्ये 55, आमेरमध्ये 33 मिमी पाऊस पडला आहे. उदयपुर वाटीच्या छापोलीतील झंझुनू तहसीलमध्येतर दोन कर्मचार्‍यांचा कदंब कुंडात डूबून मृत्यू झाला. हे दोघे कुंडात अंघोळीसाठी गेले होते. काल रात्री उशीरा त्यांना कुंडातून बाहेर काढण्यात आले.
दोन दिवसांपासून होत असलेल्या या पावसामुळे खाली असलेल्या भागात पाणी भरले आहे. तर अनंतपूरा आणि देवळी अरबमध्ये लोकांनी होड्या चालवून आपला जीव वाचवला.
कोटामध्ये 48 तासांत 10 इंचापेक्षा जास्त झालेल्या पावसाने शहरातील अनेक कॉलनी पाण्यात डुबल्या आहेत. श्रीमंत वसाहतींपासून गरीबांच्या झोपड्यांपर्यंत सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. काही काही भागात तर 4 ते 5 फुटांपर्यंत पाणी भरल आहे. तर 100 पेक्षा जास्त लोकांना वाचवण्यासाठी नगर निगम आणि एसडीआरएफची आपातकालीन टीमला बोलावण्यात आले.
मगरींनी भरलेल्या नदीमुळे दोन जणांनी झाडावर चढून जीव वाचवला
देवळी अरबमध्ये पाण्याने संपूर्ण गावाला वेढा घातला आहे. त्यामुळे जवळच असलेल्या नदीतील मगरांनी गावामध्येही फेरफटका मारला. हाथीखेडाजवळ असलेल्या मगरींनी भरलेल्या नदीमध्ये दोन जणांनी कसेबसे झाडावर चढून आपला जीव वाचवला. तर नाल्यांमध्ये पडून दोन जणांचा मृत्यू झाला. मागील 24 तासांत या ठिकाणी 150.3 मिमी पाऊस नोंदवण्यात आला. तर दोन दिवसांत 256 पाऊस झाला आहे. भामाशाह अनाज मंडीमध्ये सोयाबीनची 7000 पोती भिजली, तर 300 पोती पाण्यात वाहून गेली.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, आरएसी टीमने युवकाला कसे वाचवले, सोबतच पावसामुळे भरलेल्या पाण्यातून लोकांना वाचवण्यासाठी कशाप्रकारे होड्या चालवण्यात आल्या...