आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबच्या शिक्षकांची इंग्रजी सुधारण्यासाठी ब्रिटनची मदत घेणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - पंजाबच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान मिळावे या उद्देशाने राज्य सरकारने स्थानिक शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आखला आहे. याअंतर्गत ब्रिटनचे प्रशिक्षक इंग्रजीचे विशेष प्रशिक्षण देतील. याचा उपयोग विद्यार्थ्यांना इंग्रजी चांगले बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी होऊ शकेल. ब्रिटिश उच्चायुक्त सर डोमिनिक एसकुईथ यांनी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्याशी केलेल्या चर्चेत यावर सहमती व्यक्त करण्यात आली. यासोबत कृषी आणि कौशल्य विकासामध्येही ब्रिटनने राज्य सरकारला मदतीचे आश्वासन दिले आहे. भारत सरकारच्या मनुष्यबळ विकासाशी संबंधित प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये याचा समावेश व्हावा यासाठी यासंबंधीचा विषय ब्रिटिश काैन्सिलिंगमध्ये लवकरच उपस्थित केला जाईल, असे ब्रिटिश उच्चायुक्तांनी सांगितले. या अंतर्गत तीन वर्षांच्या कोर्सदरम्यान राज्यातील साधारण तीन हजार शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणानंतर गरज पडल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्यता प्राप्त करण्यासाठी आणखी एक वर्ष इंग्रजी शिकवण्याचे नियोजन आहे. ब्रिटिश व पंजाबच्या शिक्षकांच्या आदान-प्रदान कार्यक्रमाबाबत बादल यांनी व्यक्त केलेल्या मनोदयावर विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. याद्वारे इंग्रजी भाषेच्या शिक्षकांना तेथील संस्कृती आणि सामाजिक जीवन जाणण्याची संधी मिळेल. बादल यांनी सर एसकुईथ यांना वराह पालनाची शास्त्रोक्त पद्धती उपलब्ध करण्याचे आवाहन केले. पंजाब सरकारला वराह पालनात मदत करण्यासाठी ब्रिटिश पिग असोसिएशनने (बीपीए) याआधीच करारावर स्वाक्षरी केली आहे.
सरकार महाराज रणजित सिंगांच्या पावलावर चालते : मुख्यमंत्री
चंदिगड - मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल म्हणाले, सरकार राज्यातील सर्व समाज वर्गाच्या कल्याणासाठी महाराजा रणजित सिंग यांच्या पावलावर चालत आहे. फ्रान्समधील सेंट टरोपेज शहरात स्थापन केला जाणारा महाराजा रणजित सिंग यांचा पुतळा सेंट टरोपेजचे उपमहापौर हेन्री ऐलाड यांना सुपूर्द केला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बादल म्हणाले, महाराजा रणजित सिंग एक महान शासक होते. त्यांनी आपल्या महान धर्मगुरूंनी घालून दिलेल्या धर्मनिरपेक्षता आणि समाजवादाच्या मार्गाची योग्यरीत्या अंमलबजावणी केली. महाराजा रणजित सिंगांनी लाेककल्याणाच्या कामाला विश्वासार्ह बनवले. महाराजांचा पुतळा सेंट टरोपेज येथे स्थापन करण्यासाठी त्यांनी फ्रान्स सरकारचे आभार व्यक्त केले. फ्रान्स व पंजाबच्या ऐतिहासिक संबंधाला उजाळा देत ते म्हणाले, थोर शीख राजे महाराजा रणजित सिंग यांनी ब्रिटिश साम्राज्याचा प्रसार रोखण्यासाठी फ्रान्सचे महान योद्धे जनरल जीन फरॅक्यूस ऐलाड यांची निवड केली होती. जोपर्यंत दोघे हयात होते तोपर्यंत ब्रिटिश शासकांना पंजाबवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले नव्हते.
बातम्या आणखी आहेत...