आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा होता अखंड हिंदुस्थान, स्वार्थापोटी इंग्रजांनी 70 वर्षात केले 7 तुकडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1876 पर्यंत भारत हा असा अखंड होता. त्यानंतर इंग्रजांनी हळू हळू 71 वर्षात भारताचे 7 तुकडे पाडले. - Divya Marathi
1876 पर्यंत भारत हा असा अखंड होता. त्यानंतर इंग्रजांनी हळू हळू 71 वर्षात भारताचे 7 तुकडे पाडले.

इंटरनॅशनल डेस्क- भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात एक प्रकारची सांस्कृतिक, ऐतिहासिक समानता आहे. त्यामुळे या तीन देशांनी आगामी काळात एकत्र येऊन एक नवी आघाडी स्थापन करावी, असे वक्तव्य आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक सुधींद्र कुलकर्णी यांनी मुंबईत केले होते.


शेकडो वर्षापूर्वी भारत देश एक महाकाय हिंदुस्थान देश म्हणून जगाला परिचित होता. इंग्रजांनी भारतावर राज्य करत असताना आपल्या सोईसाठी 1876 ते 1947 या 71 वर्षाच्या कालखंडात Divide & Rule policy चा वापर करत भारताचे सात तुकडे पाडले. भारताचा सर्वात शेवटचा तुकडा 1947 साली इंग्रजांनी पाडत पाकिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. त्यानंतर भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे करत आताचा बांगलादेश जन्माला घातला.


वर्ष 1947 मध्‍ये झालेली भारत- पाकिस्‍तान फाळणी ही मागील 2500 वर्षांतील देशाची 24 वीं फाळणी होती. ज्‍या राजांनी, शक्‍तींनी मागील 2500 हजार वर्षांत भारतावर आक्रमण केले त्‍यांनी अफगानिस्तान, मॅनमार, श्रीलंका, नेपाळ, तिबेत, भूटान, पाकिस्तान, मालद्वीप किंवा बांग्लादेशावर आक्रमण केल्‍याचा उल्‍लेख इतिहासातील कुठल्‍याच ग्रंथात नाही. त्‍यामुळे हे आताचे छोटे छोटे देश तेव्हा अखंड भारतात होते याला पुष्‍टी मिळते.


पाकिस्‍तान आणि बंगलादेशाची निर्मिती कशी झाली याचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. परंतु, भारताचे तुकडे होऊन इतर देश कसे निर्माण झाले, याची फारशी माहिती कुणाला नाही. त्यामुळे आज आपण या सदरात जानून घेऊ या की, अखंड भारताचे विभाजन कधी कधी आणि कसे कसे होत गेले....


पुढे स्लाईडद्वारे पाहा, अखंड भारताचे कसे झाले विभाजन...

बातम्या आणखी आहेत...