आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • British Tourist Woman Raped And Murdered In Kashmir

काश्मिरमध्‍ये ब्रिटीश महिला पर्यटकाची बलात्‍कार करुन हत्‍या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर- प्रसिद्ध दल सरोवरामध्‍ये एका हाऊसबोटवर एका ब्रिटीश महिला पर्यटकाचा मृतदेह आढळून आला. तिच्‍यावर बलात्‍कार करुन हत्‍या करण्‍यात आली, असा पोलिसांना दाट संशय आहे.

पर्यटक महिलेचे नाव सारा एलिझाबेथ आहे. आज सकाळी तिचा मृतदेह रक्ताच्‍या थारोळ्यात आढळला. तिचे कपडेही फाडण्‍यात आले होते. तसेच तिच्‍या खोलीचा दरवाजा बाहेरुन तोडण्‍यात आला आहे. या प्रकरणी एका डच युवकाला अटक करण्‍यात आली आहे. तो त्‍याच हाऊसबोटमध्‍ये थांबला होता. श्रीनगरहून पळून जाण्‍याच्‍या प्रयत्‍नात असताना त्‍याला अटक करण्‍यात आली. श्रीनगरपासून 100 किलोमीटर अंतरावर बनिहाल बोगद्याजवळ त्‍याला अटक करण्‍यात आली. त्‍याने त्‍याचे सर्व सामान हाऊसबोटवरच टाकून दिले होते.

प्राप्‍त माहितीनुसार, ही महिला हाऊसबोटवर 2 महिन्‍यांपासून थांबली होती. तर संशयीत डच तरुण दोन दिवसांपूर्वीच तिथे दाखल झाला होता. एलिझाबेथचा मृतदहे उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्‍यात आला आहे. अहवालानंतर बलात्‍कारा झाल्‍याचे स्‍पष्‍ट होईल.