आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने लडाखमध्ये तयार केला सर्वात उंच मोटरेबल रोड, चीन बॉर्डर लगतची गावे जोडणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
BRO च्या माहितीनुसार पर्सनल्स आणि या मशिनद्वारे वेळेवर हा प्रोजेक्ट पूर्ण व्हावा म्हणून रात्रभर काम करण्यात आले. (फाइल इमेज-BRO) - Divya Marathi
BRO च्या माहितीनुसार पर्सनल्स आणि या मशिनद्वारे वेळेवर हा प्रोजेक्ट पूर्ण व्हावा म्हणून रात्रभर काम करण्यात आले. (फाइल इमेज-BRO)
श्रीनगर - बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (BRO)ने लडाखमध्ये जगातील सर्वाधिक उंच मोटरेबल रस्ता (गाडी चालवण्यास योग्य) तयार केला आहे. प्रोजेक्ट हिमांक अंतर्गत तयार करण्यात आलेला हा रोड 19,300 फूट उंचीवर उमलिंगा टॉपमार्गे जाणार आहे. रोडची लांबी 86 किलोमीटर आहे. हा रोड लेहपासून 230 किलोमीटर अंतरावरील चिसुम्ले आणि डेमचोक गावांना जोडणार आहे. हे गाव भारत-चीन सामेजवळ आहेत. 

रोड तयार करताना होता जीवाला धोका.. 
- प्रोजेक्ट हिमांक चे चिफ इंजिनीअर डीएम पुर्विमाथ म्हणाले, एवढ्या उंचीवर रस्ता तयार करणे कठीण होते. 19,300 फूट उंचीवर रस्ता तयार करण्याचे काम जीव धोक्यात घालणारे होते. कामासाठी हवामानही योग्य नव्हते. 
- कडक उन्हाळ्यातही येथे तापमान मायनस 10 ते 20 डिग्री दरम्यान असते. हिवाळ्यात तर ते मायनस 40 डिग्रीपर्यंत पोहोचते. ऑक्सिजन लेव्हलही सामान्य ठिकाणांच्या तुलनेत 50 टक्के कमी होती. खराब वातावरणामुळे यंत्रे आणि माणसांची क्षमताही 50 टक्क्यांपर्यंत कमी व्हायची. दर 10 मिनिटांनी मशीन ऑपरेटर्सना ऑक्सिजनसाठी खाली उतरावे लागायचे. 
- एवढ्या उंचीवर यंत्रे नेणेही आव्हानात्मक होते. त्याशिवाय मेंटेनन्स आणि रिपेरिंगचे आव्हानही होते. अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागला. 

आरोग्याची समस्या सर्वात मोठी 
- अशा कठीण परिस्थितीत काम केल्यामुळे BRO कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या समस्यांचाही सामना करावा लागला. अनेकांना मेमरी लॉस, आयसाइट आणि हाय ब्लड प्रेशरच्या समस्येचा सामना करावा लागला. 
- देश आणि लष्कराला असलेली गरज लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांनी वेळेत प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी रात्रभर काम केले. 

प्रोजेक्ट हिमांक अंतर्गत उंचावर तयार केलेले रस्ते.. 
19,300 फूट - लडाखमधील मार्ग 
17,900 फूट - खारडांगू ला मार्ग 
17,695 फूट - चांगला पास 
 
 
बातम्या आणखी आहेत...