आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

19 वर्षांच्या दिरासोबत वहिणीने केले सुसाईड, सासऱ्यांनी सांगितली अनैतिक संबंधांची कहाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रुपिंदर कौरचा मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला. वैद्यकीय तपासणी करताना अधिकारी. - Divya Marathi
रुपिंदर कौरचा मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला. वैद्यकीय तपासणी करताना अधिकारी.
लुधियाना (पंजाब)- हरियाणाच्या अंबाला जिल्ह्यातील करनाला गावातील 25 वर्षिय रुपिंदर कौरने 19 वर्षिय दीर गुरमोहितसिंग याच्यासोबत घनौर येथील कालव्यात उडी मारुन आत्महत्या केली. रुपिंदरचा मृतदेह घटनास्थळी सापडला. पण गुरमोहित याचा मृतदेह हरियाणात वाहून गेला होता. दोघांमध्ये प्रेम आणि अनैतिक संबंध असल्याने आत्महत्या केली असावी, अशी पोलिस चौकशीत आढळून आले आहे.
वहिणी-दीरात अनैतिक संबंध
- रुपिंदरचे सासरे अमरीकसिंग यांनी सांगितले, की मी तिला अनेकदा सांगितले होते, की गुरमोहितपासून दूर राहा. पण तिने माझे ऐकले नाही.
- गुरमोहितच्या ती खुप जवळ होती. दोघांमध्ये प्रेम आणि अनैतिक संबंध होते, असा कुटुंबीयांना संशय होता.
- पण या प्रकरणी कुटुंबातील सदस्य आणखी काही सांगण्यास तयार नाहीत.
- घटनेच्या दिवशी दोघे दुचाकीवर घटनास्थळी आले होते. गुरमोहितने मोबाईल फोन मोटरसायकलवर ठेवला. त्यानंतर दोघांनी कालव्यात उडी मारली.
- काही लोकांनी दोघांना उडी मारताना बघितले होते. त्यानंतर त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण रुपिंदरचा मृत्यू झाला होता. गुरमोहितचा मृतदेह वाहून गेला होता.
चार वर्षांपूर्वी झाले होते रुपिंदरचे लग्न
- रुपिंदर कौरचे लग्न चार वर्षांपूर्वी हरदीपसिंग यांच्यासोबत झाले होते. त्यांना चार वर्षांचा मुलगाही आहे. अंबालाच्या ट्रान्सपोर्ट एरियात हरदीपसिंग काम करतो.
- गुरमोहितसिंग त्याच्या सख्खा भाऊ नव्हता. पण नात्यातील भाऊ असल्याने त्याचे हरदीपसिंगच्या कुटुंबीयांशी चांगले संबंध होते.
- तोही अंबाला ट्रान्सपोर्ट एरियात कामाला होता. त्यामुळे जवळपास दररोज तो हरदीपसिंगच्या घरी यायचा.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा या घटनेचे फोटो.....
बातम्या आणखी आहेत...