आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहीण ऐकत नव्हती म्हणून भावाने केले हे काम, भाऊबिजेच्या दिवशी उलगडले रहस्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्याच्या मलेनी नदीत 12 ऑक्टोबर रोजी झालेल्या तरुणीच्या मृतदेहाचे गूढ भाऊबीजच्या दिवशी उकलले आहे. तरुणीचा खून तिच्या भावानेच केला होता. पोलिसांनी शनिवारी आरोपी भावाला अटक केली. आरोपी म्हणाला की, मी बहिणीच्या वाईट सवयींमुळे त्रस्त झालो होतो. 12 ऑक्टोबरला त्याने बेदम मारहाण करून बहिणीला कारच्या डिक्कीत ठेवून नदीत फेकले होते. येथे बुडून तिचा मृत्यू झाला.
 
पैंजणावरून सुरू झाला तपास...
- पोलिस सूत्रांनुसार, मृत तरुणी कशिशच्या पीएम रिपोर्टमध्ये तिचा मृत्यू बुडाल्याने झाल्याचे सांगण्यात आले. कुटुंबीयांनी ती मानसिक रुग्ण असल्याचे म्हटले. 
- पोलिसांनी घटनास्थळी तपास केला तेव्हा पुलाजवळ कशिशची तुटलेल्या पैंजणचा एक तुकडा मिळाला. यामुळे पोलिसांना खुनाचा संशय आला.
- प्रकरणाच्या तपासात कळले की, कशिशच्या वाईट संगतीमुळे तिचे कुटुंबीय त्रस्त झाले होते.
- तिचे अनेक मुलांशी मैत्री आणि त्यांच्यासोबत हिंडणे घरच्यांना आवडत नव्हते. यामुळेच खुनाच्या काही दिवस आधी घरच्यांशी कशिशचे जोरदार भांडण झाले होते, यानंतर ती घर सोडून दुसरीकडे राहू लागली होती.
 
भावाचे ऐकले नाही, म्हणून बेदम मारले
- 11 ऑक्टोबरच्या रात्री मोठा भाऊ अल्मश ऊर्फ आशु हा कशिशला भेटण्यासाठी गेला. तेथे त्याने कशिशला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकायला तयार नव्हती.
- यावर चिडलेल्या भावाने कशिशला बेदम मारहाण केली आणि तिला कारच्या डिक्कीत टाकून मलेनी नदीच्या पुलावर पोहोचला.
- येथेही त्याने तिला समज दिली, पण कशिशवर याचा काहीच परिणाम होत नसल्याचे पाहून रागाच्या भरात भावाने तिला पुलावर खाली नदीत फेकले. येथे बुडाल्याने तिचा मृत्यू झाला.
- मारहाणीत कशिशची पैंजण तुटून तिथेच पडली, यावरूनच खुनाचा उलगडा झाला.
- कशिशच्या खुनानंतर तिचा भाऊ इंदूरला पळून गेला. पोलिसांनी डिक्कीतून कशिशचा मोबाइल फोन आणि तुटलेली पैंजण हस्तगत केली आहे. शनिवारी पोलिसांनी आरोपी अल्तमशला अटक केली.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...