आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बुरखा ओढून सख्‍ख्‍या भावानेच केला बहिणीवर बलात्‍कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिलखुवा (उत्तर प्रदेश): महिला आणि लहान मुलींच्‍या सुरक्षेचा प्रश्‍न दिवसेंदिवस अतिशय गंभीर होत आहे. परके तर सोडाच, रक्ताच्‍या नात्‍याला काळीमा फासणा-या घटना समोर येत आहे. उत्तर प्रदेशमध्‍ये एका तरुणाने स्‍वतःच्‍या 10 वर्षांच्‍या सख्‍ख्‍या बहिणीवरच बलात्‍कार केल्‍याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीला गंभीर अवस्‍थेत रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले असून तिच्‍यावर उपचार सुरु आहेत.

प्राप्‍त माहितीनुसार, पीडित मुलीचे कुटुंबिय बुलंदशहरमध्‍ये भाड्याने राहतात. मुलीचे आईवडील कामानिमित्त बाहेर गेले होते. त्‍यावेळी एक तरुण चेह-यावर रुमाल गुंडाळून घरात शिरला आणि मुलीवर बलात्‍कार करुन पळाला. आईवडील घरी परतल्‍यावर हा प्रकार त्‍यांना दिसला. तिला तात्‍काळ जिल्‍हा रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. त्‍यानंतर वडिल तक्रार देण्‍यासाठी पोलिस ठाण्‍यात पोहोचले. मुलीचा नराधम भाऊदेखील त्‍यांच्‍यासोबत पोलिस ठाण्‍यात होता. पोलिसांना त्‍याच्‍या हालचालीवरुन संशय आला. कडक चौकशी केल्‍यानंतर त्‍याने गुन्‍हा कबूल केला. त्‍यानंतर त्‍याला अटक करण्‍यात आली.

पोलिसांनी केलेल्‍या तपासात पीडितेचा भाऊच दोषी आढळला. त्‍याला दारुचे व्‍यसन होते. त्‍यामुळे बहुतांश वेळ घराबाहेरच असायचा. आईवडील घरात कधी नसतात, हे त्‍याला चांगले ठावूक होते. हीच वेळ साधून बहिणीलाच लक्ष्‍य केले.