आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारित्र्यावर संशय, बॉयफ्रेंडने केले गर्लफ्रेंडचे तुकडे, पिशवीत भरून फेकले गावाबाहेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर- छत्तीसगडच्‍या भिलाईमध्‍ये झालेल्‍या एक खळबळजनक हत्‍याकांडाचा पोलिसांनी खुलासा केला आहे. एका बॉयफ्रेंडने प्रेम प्रकरणाच्‍या संशयातून त्‍याच्‍या गर्लफ्रेंडला आधी दारू पाजली नंतर तिचे हात-पाय बांधून गळा घोटला. एवढे करुनही तो थांबला नाही तर, त्‍याने युवतीचे डोके, हात, पाय कापून धडावेगळे केले.

संशयातून हत्‍या..
- पोलिसांनी दिलेली माहिती: 24 वर्षीय आरोपी कमल देशमुखचे मरोदा(भिलाई)मध्‍ये राहणा-या सुभद्रा यादव या युवतीसोबत प्रेमसंबंध होते.
- कमलचा सुभद्रावर संशय होता. तिचे आणखी दुस-याशी संबंध आहेत असे, त्‍याला वाटत होते.
- या संशयातूनच त्‍याने तिची अत्‍यंत क्रुरपणे हत्‍या केल्‍याचे पोलिस सांगतात.
- आरोपीने 28 जुलैरोजी ही हत्‍या केली.
- त्‍याने सुभद्राला बोलावले तिला दारू पाजली. नंतर तिचे हात-पाय बांधले व गळा घोटला.
- त्‍यानंतर धारदार चाकूने तिचे हात पाय डोके कापले.
- मृतदेहाचे तुकडे तुकडे करून एका सिमेंटच्‍या बॅगमध्‍ये भरले.
- अशा दोन पिशव्‍या घेऊन तो गावाबाहेर गेला.
- एका सुनसान परिसरात त्‍याने या पिशव्‍या फेकून दिल्‍या.
- पोलिसांनी या दोनही पिशव्‍या ताब्‍यात घेतल्‍या आहेत.
फोटोज - कोमल वर्मा.
टीप- पुढील स्‍लाइड्सवरील फोटो अत्‍यंत भडक आहेत.
बातम्या आणखी आहेत...