आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्‍हा एक घरचा भेदी अटकेत, BSF जवान करत होता PAK तस्‍करांची मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगंगानगर - पाकिस्‍तानसाठी हेरगिरी करणाऱ्या एका बीएसएफ कॉन्‍स्‍टेबलला राजस्थानच्‍या रायसिंहनगरमधून अटक करण्‍यात आली. अनिल कुमार असे त्‍याचे नाव असून, तो अंमली पदार्थ आणि शस्‍त्रासाठी पाकिस्‍तानची तस्‍करांची मदत करत होता. पठाणकोट हल्‍ल्‍यानंतर सरकार खडबडून जागे झाले असून, पाकिस्‍तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे.
कॉन्‍स्‍टेबलला कसे पकडले...
- 5 जानेवारी रोजी मोहाली पोलिसांनी गुरजंटसिंह ऊर्फ भोलू, जितेंद्रसिंह उर्फ जिंदी और संदीपसिंह यांना अटक केली होती.
- त्‍यांच्‍याकडून चार पिस्टल, एक एअरगन, 190 जिंवत काडतूस, 31 मोबाइल फोन आणि पाकिस्तानी मोबाइल फोनसह‍ सिम कार्ड जब्त करण्‍यात आले होते.
- हे तिघेही अंमली पदार्थांची तस्‍करी, खून या प्रकरणात राजस्थान आणि पंजाब पोलिसांच्‍या वॉण्‍टेड यादीत होते.
- आपण खूप दिवसांपासून पाकिस्‍तानातून हेरोइन, स्‍मॅक आणि इतर नशिल्‍या पदार्थांची तस्‍करी करत असल्‍याची कबुली त्‍यांनी दिली.
- शिवाय या कामी रायसिंहनगर बॉर्डरवर तैनात असलेला बीएसएफ जवान अनिल हासुद्धा मदत करत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
- नंतर पोलिसांनी गृहमंत्रालयाच्‍या मंजुरीनंतर त्‍याला अटक केली.
- तो 2008 मध्‍ये बीएसएफ तो भरती झाला होता. त्‍याने आपला गुन्‍हा कबुल केल्‍याचे सांगितले जात आहे.
काय म्‍हणाले पोलिस?
- काही दिवसांपासून या जवानाच्‍या मोबाइलवर पाळत ठेवण्‍यात येत होती.
- पाक एजेंटसोबत या जवानाचा संकर्प झाल्‍याचेही उघड झाले आहे.
- जवानाच्‍या मोबाइलचे सर्व रेकॉर्ड पोलिसांच्‍या हाती लागले आहे.
- पोलिसांच्‍या माहितीनुसार, अनिल ड्रग स्मगलर गुरजंट सिंह उर्फ भोलू याला मदत करत होता.
- मोहालीचे एसएसपी गुरप्रीत सिंह भुल्लर यांच्‍या मतानुसार, हे दोघे फेसबुक आणि व्‍हॉट्स अॅपव्‍दारे एकमेकांच्‍या संपर्कात होते.
- पोलिसांच्‍या माहितीनुसार, आरोपी सिंगल डिलिव्‍हरीसाठी 40,000 ते 50,000 हजार रुपये घेत होता.
- पोलिसांनी असेही सांगितले की, गुरजंट आणि जवानाची एका लग्‍न सोहळ्यात भेट झाली होती.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, यापूर्वी पकडले वायू दलाचे दोन कर्मचारी..
बातम्या आणखी आहेत...