आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

90च्या दशकानंतर प्रथमच AK-47 घेऊन दहशतवाद्यांची रॅली, 46 दिवसानंतर उठला कर्फ्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
90च्या दशकांनंतर प्रथमच दहशतवाद्यांनी खुलेआम मोर्चे काढले. - Divya Marathi
90च्या दशकांनंतर प्रथमच दहशतवाद्यांनी खुलेआम मोर्चे काढले.
श्रीनगर - काश्मीरमध्ये गेल्या एक महिन्यात दहशतवाद्यांनी सहापेक्षा जास्त रॅली काढल्या होत्या. 90च्या दशकांनंतर हे पहिल्यांदा घडले आहे. दहशतवाद्यांनी खुलेआम मोर्चे काढले होते. परिस्थिती एवढी वाईट झाली होती की गेल्या महिन्याभरात एकाही मोठ्या नेत्याने, मंत्री, आमदार यांनी रॅली काढलेली नाही. मात्र उत्तर आणि दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवादी रॅली आयोजित करुन सामान्यांना फुटीरतावाद्यांसोबत या असे धमकावत आहेत. येथील हिंसाचाराला पायबंद घालण्यासाठी 12 वर्षांनंतर सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, 46 दिवसांनंतर मंगळवारी श्रीनगरच्या काही भागातील कर्फ्यू उठवण्यात आले आहे.
स्टेजवर एखादा दहशतवादी नाही, संपूर्ण ग्रुप असतो
- दहशतवादी खोऱ्यात कुठे-कुठे रॅली करत आहेत, याची संपूर्ण माहिती सुरक्षा यंत्रणांकडे आहे. दहशतवादी कोणालाही न घाबरता थेट स्टेजवरुन देशाविरोधात भाषण करत आहेत. याचा अहवाल पोलिस मुख्यालय आणि राज्य शासनाच्या गृहखात्याला पाठविण्यात आला आहे.
- दक्षिण काश्मीरचे डीआयजी नितीशकुमार म्हणाले, जाहीर सभांमध्ये दहशतवाद्यांच्या उपस्थितीची चौकशी केली जात आहे. कुलगामचे पोलिस अधीक्षक याची चौकशी करत आहेत. गुन्हे दाखल केले असून, कुलगामच्या एका सभेचा फोटोही पोलिसांकडे आहे.
- या प्रकरणी पोलिसांनी एका आयोजकाला ताब्यात घेतले आहे. बाकिच्यांचा शोध घेतला जात आहे.
- 8 जुलै रोजी बुऱ्हान वणीच्या एन्काऊंटरनंतर काश्मीरमध्ये हिंसाचार भडकला होता. या हिंसाचारात आतापर्यंत 66 लोक मारले गेले आहेत.

12 वर्षांनंतर BSF
काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी बीएसएफला तैनात करण्यात आले आहे. 12 वर्षांनंतर राज्यात बीएसएफला पाचारण केले गेले आहे. श्रीनगरच्या लाल चौक पासून खोऱ्यातील अनेक भागात बीएसएफने मोर्चा सांभाळला.
- बीएसएफच्या प्रवक्त्याने कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आम्ही आलो असल्याचे म्हटले आहे. 2004 पासून बीएसएफ खोऱ्यात अॅक्टिव्ह नव्हते.
- या पॅरा-मिलिटरी फोर्सने 1991 ते 2004 पर्यंत दहशतवाद्यांविरोधात मोर्चा उघडला होता.

आता कशी आहे खोऱ्यातील परिस्थितीत
- जम्मू-काश्मीरच्या राजधानीमधील अनेक भागातील कर्फ्यू आता उठवण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेक भागातून परिस्थिती सुधारत असल्याचा रिपोर्ट आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
- पीटीआयच्या वृत्तानुसार डाऊन टाऊनमधील पाच पोलिस स्टेशन आणि अप टाऊनचे बाटामालू, माइसुमा आणि कर्लाखूद येथे कर्फ्यू कायम राहील.
- साऊथ काश्मीरमधील अनंतनागमध्ये अजूनही कर्फ्यू आहे. मात्र, परिस्थिती निवळत असल्यामुळे लोकांना ये-जा करण्याची सूट देण्यात आली आहे.
- सोमवारी आठ पोलिसस्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरात आठ तास कर्फ्यू शिथील करण्यात आला होता.
पुढील स्लाइडवर वाचा, राजनाथ काश्मीर खोऱ्यात दोन दिवस तळ ठोकणार, मंगळवारी उठवण्यात आला कर्फ्यू...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...