आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएसफने पाकिस्तानच्या सीमेजवळ शोधले भुयार , तीन महिन्यात BSF ला दुसरे यश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - बीएसएफ म्हणजेच सीमा सुरक्षा दलाने आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानच्या बाजूने सुरू होणारे एक भुयार सांबा क्षेत्रात शोधून काढले. याचा दहशतवादी घुसखोरीसाठी सर्रास वापर करत असत. बीएसएफच्या या भुयार शोधमोहिमेत हे भुयार साधारणत: २० मीटरचे आहे असे लक्षात आले. सीमा कुंपणाजवळील हे भुयार भारतीय क्षेत्रात येण्यासाठी उपयोगी पडत असे. रामगड क्षेत्रातील हा प्रकार काल सोमवारी उघडकीस आल्याचे बीएसएफचे उपमहासंचालक धर्मेंद्र पारीख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.   
 
हे भुयार २.५ फूट विरुद्ध २.५ फूट या आकारातील व रुंदीतील आहे. अजूनही त्याचे काम पूर्ण व्हावयाचे होते. त्याआधीच ते उघड झाले. बीएसएफच्या तुकडीने ते एका प्रसंगात शोधले. अतिरेकी हे काम पाक रेंजर्सच्या मदतीने करत होते. याविषयी बीएसएफ आणि पाक रेंजर्समध्ये लवकरच फ्लॅग मीटिंग होणार आहे. 
 
काय आहे प्रकरण 
- मीडिया रिपोर्टनुसार, बीएसएफची अँटी टनेल अँड डिटेक्टिंग टीमने सोमवारी रामगड सेक्टरमध्ये सर्चिंग केल होते. या दरम्यान परिसरात त्यांना काही संशयास्पद गोष्टी आढळल्या. 
- जवानांनी परिसराची तपासणी केली तेव्हा 20 मीटर लांबीचे भूयार सापडले. याचे एक टोक भारतात तर दुसरे पाकिस्तानात होते. आंतरराष्ट्रीय सीमेवरील तार फेसिंगखालून हे भूयार होते. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...