अमृतसर - वाघा बॉर्डरवर पाकिस्तानच्या हद्दीत रविवारी सायंकाळी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 55 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर सतर्क झालेल्या बीएसएफने वाघा बॉर्डरवरील सुरक्षेत वाढ केली आहे. बीएसएफने सुवर्ण जयंती द्वारावर तैनात असलेल्या जवानांच्या संख्येतही वाढ केली आहे.
1971 नंतर प्रथमच वाघामध्ये मोठा हल्ला
ज्याठिकाणी हल्ला झाला ते ठिकाण अमृतसरहून 32 किलोमीटर आणि लाहोर 22 किमी दूर आहे. वाघामध्ये बीएसएफ आणि पाकिस्तानी रेंजर्स 53 वर्षांपासून बीटिंग रिट्रीट सेरेमनीचे आयोजन करतात. वाघा बॉर्डरवर तसा हा पहिलाच हल्ला आहे. 1971 च्या युद्धानंतर आतापर्यंत याठिकाणी शांतता आहे.
ऐतिहासिक जीटी रोड
ज्या मार्गावर वाघा आहे तो परिसर स्वातंत्र्यापूर्वी पंजाबमध्ये ग्रँड ट्रंक रोड नावाने प्रसिद्ध होता. त्याला सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. एकेकाळी हा मार्ग काबूल (अफगाणिस्तान) आणि चटगांव (बांग्लादेश) यांच्यातील दुवा मानला जात होता. हिंदु राज्यकर्ते त्याला उत्तर पथ आणि मोगल त्याला सडक-ए-आजम म्हणायचे. ब्रिटनच्या इतिहासकारांनी त्याला लाँग वॉकही म्हटले आहे.
भारतचाकडे होती गुप्तचर माहिती
बीएसएफचे डीजी डी.के.पाठक यांना सांगितले की, आम्हाला सुमारे पंधरा दिवसांपूर्वी या हल्ल्याच्या संदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. त्यात सेरेमनीदरम्यान हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे आम्ही आधीच अलर्ट झालो होतो.
पुढील स्लाइड्सवर पाहा, वाढवलेल्या सुरक्षेचे आणि पाकिस्तानातील PHOTO