आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषबाधेने बीएसएफचे ३९ जवान रुग्णालयात, खाद्यसामग्री दूषित आढळल्याने खळबळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाडमेर- भारत-पाक सीमेवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या ६३ व्या बटालियनच्या चार्ली कंपनीत अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे गेल्या ४ दिवसांत ३९ जवान आजारी पडले. बाडमेरच्या शासकीय रुग्णालयात एकाच वेळी २० जवानांना दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे निदान केल्यानंतर एकच खळबळ उडाली.  

स्टूल कल्चरचे नमुने जयपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. बीएसएफ जवानांत खळबळ माजली असून दुसऱ्याच दिवशी खानावळीतील धान्य व पाणी बदलण्यात आले. तरीही जवानांमध्ये उलट्या व जुलाबाची लागण झालेली आहे.  सीमेवर तैनात असलेल्या जवानांनी जेवण केल्यानंतर त्यांना उलट्या व जुलाब सुरू झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले. आता त्यांची प्रकृती सामान्य आहे.  

धान्य किंवा भाज्यांमध्ये विषाणूचे प्रमाण
चार्ली बटालियनचे एकाच वेळी ३९ जवानांना उलट्या -जुलाब सुरू झाल्याने रेशनिंगचे सामान किंवा भाज्या दूषित असल्याची किंवा त्यांची गुणवत्ता योग्य नसल्याची शक्यता वर्तवण्यात आली. या खाद्यसामग्रीची तपासणी केल्यानंतरच खरी माहिती हाती येईल.
बातम्या आणखी आहेत...