आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद्यांचा कर्दनकाळ गुरनामसिंगचे पार्थिव तिरंग्यात आले, अख्खे गाव ढसाढसा रडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - पाकिस्तानच्या रेंजर्समध्ये दहशत निर्माण करणारा गुरनामसिंग याचा मृतदेह अखेर तिरंग्यात गावी पोहोचला. लष्करी इतमामात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू येथील आरएसपुरा परिसरात त्याचे घर आहे. यावेळी अंतिम दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अंत्ययात्रा काढण्यात आली तेव्हा अख्खे गाव ढसाढसा रडताना दिसून आले. त्याची बहिण गुरजीतने सांगितले, की बालपणापासूनच त्याला लष्करात जायचे होते. लष्कराच्या गाड्या बघून तो त्यांना सॅल्युट मारायचा.
गुरनामचे वडील म्हणाले, आता पाकिस्तानवर हल्ला करा
- पाकिस्तान लपून छपून वार करतो. त्याला अद्दल घडवायला हवी. मी मोदींना अपिल करतो, की त्यांनी युद्धाचा आदेश द्यावा.
- माझा मोठा मुलगा देशासाठी कामी आला. आता मी माझ्या लहान मुलालाही देशसेवेसाठी देणार आहे.
- गुरनामला भारतीय लष्करात जायचे होते. 2010 मध्ये त्याने बीएसएफ जॉईन केले.
- आरएसपुरा येथील अर्निया सेक्टर परिसरातील रठाना वळणावर त्याचे पिढीजात घर आहे. त्याचे कुटुंब अत्यंत साधारण आहे.
- गुरनामचे आईवडील आणि भाऊ-बहिण येथेच राहतात. त्याची आजीही सोबत असते.
- गुरनामचे वडील स्कूल बसवर ड्रायव्हर आहेत. जखमी गुरनाम बरा होईल असा त्यांना विश्वास होता. पण अखेर काळाने झडप घातलीच.
पुढील स्लाईडवर बघा, गुरनामच्या अंतिम यात्रेचे फोटो.... अख्खे गाव असे ढसाढसा रडले....
बातम्या आणखी आहेत...