आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

J&K: सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी गुप्तहेराला अटक, 2 ठिकाणी शस्त्रसंधीचे उल्लंघन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानचा एक हेर बोधराज याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे पाकिस्तानातील दोन सिम आणि नकाशा सापडला. तर, आरएस पूरा सेक्टरमध्ये आतंरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून पु्न्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. त्यासोबतच एलओसीजवळील मंजाकोट सेक्टरमध्ये अत्याधुनिक शस्त्रांनी फायरिंग करण्यात आले. भारतीय सैन्याने याला जोरदार प्रत्युत्तर दिले. शुक्रवारी हीरानगर, राजौरी आणि पुंछ भागात तीनवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. हीरानगर येथे बीएसएफने पाक रेंजर्सचे सात सैनिक ठार केले तर तीन जखमी झाले.
बीएसएफच्या कारवाईत 7 पाकिस्तानी रेंजर्स ठार
जम्मू-काश्मीरमध्ये पाककडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन सुरूच आहे. शुक्रवारी सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानच्या बाजूने सुरू असलेल्या गोळीबाराला सडेतोड उत्तर दिले. बीएसएफच्या या कारवाईत 7 पाकिस्तानी रेंजर्स व एक अतिरेकी ठार झाला.
पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून कठुआ भागात सकाळी गोळीबार सुरू केला. अतिरेक्यांच्या घुसखोरीसाठी पाकिस्तानी जवान गोळीबार करत असल्याचे सांगण्यात येते. भारतीय लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानी लष्कराचे मोठे नुकसान झाल्याचे मानले जाते. सकाळी पाकिस्तानच्या एका रेंजर्सला ठार केले. त्यानंतर सायंकाळपर्यंत सुरू असलेल्या कारवाईत सात पाकिस्तानी जवान ठार झाले. राजौरीमध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या घुसखोरीचा डाव उधळला.
दुसरीकडे बारामुला येथे दहशतवादी लपून बसले असल्याच्या माहितीनंतर आर्मीने घरा-घरात जाऊन सर्च ऑपरेशन केले.
हीरानगर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून 30 मिनिट फायरिंग..
- हीरानगर येथेच बुधवारी रात्री बीएसएफने दहशतवाद्यांची घुसखोरी हाणून पाडली होती.
- या फायरिंगमध्ये भारतीय जवान गुरनामसिहं गंभीर जखमी आहेत. ते 173 बीएसएफ ई कंपनीचे जवान आहेत. त्यांच्या डोक्यात गोळी लागली असून त्यांच्यावर जम्मूमध्ये उपचार सुरु आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सर्जिकल स्ट्राइकनंतर कु्ठे झाले हल्ले..
बातम्या आणखी आहेत...