श्रीनगर- जम्मू जिल्ह्यातील अखनूर क्षेत्रातील एक बीएसएफ जवान पाकिस्तानच्या हद्दीत वाहून गेल्याची घटना घडली आहे. चेनाब नदीवर आज (बुधवार) सकाळी ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएफच्या 33 व्या बटालियनचे पाच जवान चेनाब नदीत गस्त घालत असताना त्यांच्या नौकेत तांत्रिक बिघाड झाला. नौका बंद पडली. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने नौका वाहून जात असताना पाचही जवानांनी पाण्यात उड्या घेतल्या. पाच पैकी एक जवान बेपत्ता आहे. सत्यशील यादव असे या जवानाचे नाव आहे.
चेनाब नदीचा नदीचा प्रवाह पाकिस्तानच्या दिशेने आहे. त्यामुळे हा जवान पाकीस्तानात वाहून गेल्याची शंका बीएसएफने व्यक्त केली आहे. या घटनेबाबत पाकिस्तानी समकक्षाला सूचना देण्याबाबत आल्याचे सूत्रांनी सांगितले.