आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेरगिरी करणाऱ्या बीएसएफ कॉन्स्टेबलला अटक, ५२ व्या बटालियनमध्ये होता तैनात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रतिकात्मक - Divya Marathi
फोटो - प्रतिकात्मक
श्रीगंगानगर - पंजाब पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या बीएसएफ कॉन्स्टेबल अनिल कुमार यांना शनिवारी अटक केली. मादक पदार्थ आणि शस्त्रांची तस्करीच्या टोळीला मदत करत होता.

आरोपी रायसिंहनगरच्या ५२ व्या बटालियनमध्ये तैनात होता. बीएसएफने आरोपी कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे. मोहाली पोलिसांनी ५ जानेवारी रोजी गुरजंटसिंह, जितेंद्रसिह आणि संदीपसिंह यांना अटक केली होती. तिन्ही आरोपी राजस्थान, पंजाब पोलिसांनी लूट, मादक पदार्थांची तस्करी, हत्येच्या प्रकरणात हवे होते. अनेक दिवसांपासून हे आरोपी पाकिस्तानातून हेरॉइन, स्मॅक व इतर मादक पदार्थांची तस्करी करत आहेत. तस्करीसाठी रायसिंहनगर सीमेवर तैनात कॉन्स्टेबल अनिल कुमार त्यांची साथ देत होता. मोहाली पोलिसांनी पहिल्यांदा याबाबतची माहिती बीएसएफला दिली होती. त्यानंतर उच्चाधिकाऱ्यांनी ही माहिती गृहमंत्रालयास दिली. बीएसएफची मंजुरी मिळाल्यानंतर मोहाली पोलिसांनी शनिवारी सकाळी अनिल कुमारला अटक केली. तो २००८ मध्ये बीएसएफमध्ये भर्ती झाला होता. त्याने पाकिस्तानी तस्करांसाठी काम करत असल्याची कबुली दिली होती.