आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BSF Jawans Dance On Border After Team India\'s Win Over Pakistan

तिरंगा घेऊन नाचले BSF चे जवान, बॉर्डरवर दिसला टीम इंडियाचा विजयोत्सव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीएसएफच्या जवानांनी तिरंगा हाती घेऊन नृत्य केले. - Divya Marathi
बीएसएफच्या जवानांनी तिरंगा हाती घेऊन नृत्य केले.
जम्मू- आशिया कप टी-20 टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानवर रोमांचक विजय मिळवला. या विजयाचा जल्लोष संपूर्ण देशात बघायला मिळाला. बॉर्डवरही याचा आनंद झळकला. जम्मूच्या बॉर्डरवर बीएसएफच्या जवानांनी तिरंगा हातात घेऊन जल्लोष केला. टीम इंडियाने पाकिस्तानला हरवल्याचे वृत्त टीव्हीवर झळकल्यानंतर जवानांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. जवानांनी जोरदार घोषणा देत ताल धरला.
देशभरात अवतरली दिवाळी
टीम इंडिया विजयी झाल्याची बातमी टीव्हीवर झळकल्यानंतर देशभरात फटाके वाजवण्यात आले. आकाश वेगवेगळ्या रंगाच्या आतषबाजीने सजून गेले. त्यामुळे हा सामना न बघणाऱ्या लोकांना मात्र आश्चर्याचा धक्का बसला. अचानक दिवाळी कशी काय सुरु झाली असा प्रश्न पडला. काही उत्साही तरुण तर दुचाकी चालवत जोरदार घोषणा देत होते. त्यांच्या हातात तिरंगा दिसून येत होता.
ढोलकीच्या तालावर नाचले भारतीय
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने चौकार मारत विजयाचा झेंडा रोवला. त्यानंतर लोकांनी ढोलकीच्या तालावर नृत्य केले. विशेष म्हणजे दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापिठातही या विजयाचा जल्लोष दिसून आला. मोठमोठ्या शहरांमधील हॉटेलमध्ये मॅच बघण्यासाठी मोठमोठ्या स्क्रीन लावल्या होत्या. अनेक प्रेक्षक सॅटर्डे नाईट एन्जॉय करीत मॅच बघताना दिसून आले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, देशभरात कसा राहिला मॅचचा जल्लोष.... जवानांनी बॉर्डवर असा धरला ताल...