आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BSF ने उधळली घुसखोरी, फायरिंगमध्ये जखमी जोडीदाराची बॉडी ओढताना दिसले दहशतवादी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिरानगर (जम्मू-काश्मीर) - कठुआ सेक्टरमधील हिरानगर भागात बुधवारी रात्री बीएसएफ जवानांनी दहशहतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला. बीएसएफच्या माहितीनुसार, दहशतवादी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत होते. जवानांनी त्यांना रोखण्यासाठी फायरिंग केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक दहशतवादी जखमी जोडीदाराची बॉडी ओढत असल्याचे दिसत आहे.

मध्यरात्रीची घटना
- ही घटना बुधवार रात्रीची आहे. बीएसएफ आयजी (जम्मू) डीके उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, " कठुआ सेक्टरच्या हिरानगर भागात एक मुव्हमेंट दिसून आली. शोध घेतल्यानंतर 5 ते 6 दहशतवादी सीमारेषेच्या घुसण्याचा प्रयत्न करताना दिसले."
- "बीएसएफ जवानांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केले. दोन्ही बाजूने फायरिंग झाली. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये 5 ते 6 दहशतवादी दिसत आहेत."
बातम्या आणखी आहेत...