आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1200 पाकिस्तानींची माहिती मिळवणारे हे आहेत 1965 च्या युद्धातील हिरो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत-पाकिस्तानादरम्यान 1965 मध्ये झालेले युद्ध आणि रणछोडदास रबारी यांचा फाईल फोटो - Divya Marathi
भारत-पाकिस्तानादरम्यान 1965 मध्ये झालेले युद्ध आणि रणछोडदास रबारी यांचा फाईल फोटो
पोरबंदर - भारतीय सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) ने ‘मार्गदर्शक’ आम आदमीच्या सन्मानार्थ त्यांच्या बॉर्डर पोस्टचे नामकरण केले आहे. या पोस्टवर रणछोडदास यांचा एक पुतळाही लावला जाणार आहे. उत्तर गुजरातच्या सुईगाव अांतरराष्ट्रीय सीमा क्षेत्रात एका बॉर्डर पोस्टला रणछोडदास यांचे नाव देण्यात आले आहे.

रणछोडभाई रबारी यांनी भारत-पाकिस्तानदरम्यान 1965 आणि 71 च्या युद्धाच्या वेळी लष्कराला जी मदत केली होती, ती सामरीक दृष्ट्या अत्यंत निर्णायक ठरली होती. जानेवारी-2013 मध्ये 112 व्या वर्षी रणछोडभाई यांचे निधन झाले होते. बीएसएफचे इन्सपेक्टर जनरल ए.के.सिंह यांनी दिलेल्या महितीनुसार केंद्र सरकारच्या वतीने परवानगी मिळाल्यानंतर पोस्टचे नामकरण करण्यात आले आहे. तसेच त्यांच्याबाबत आणि त्यांच्या योगदानाबाबतही संक्षिप्त माहितीही दिली जाणार आहे.

सुरक्षा दलाच्या अनेक पोस्ट मंदिर, दर्गा आणि जवानांच्या नावावर आहे. पण रणछोडभाई हे पहिले असे गुजराती आहेत ज्यांच्या नावावर या पोस्टचे नामकरण करण्यात आले आहे. रणछोडभाई अविभाजित भारताच्या पेेथापूर गथडो गावाचे रहिवासी होते. फाळणीच्या काळात पेथापूर गथडो पाकिस्तानात गेले. पशुधनावर रणछोडभाई यांचा उदरनिर्वाह चालतो. पाकिस्तानी सैनिकांच्या वागणुकीने त्रस्त झाल्यामुळे रणछोडभाई हे बनासकांठा (गुजरात) मध्ये स्थायिक झाले होते.

1965 च्या युद्धातील भूमिका
साल 1965 च्या सुरुवातीला पाकिस्तानी लष्कराने भारताच्या कच्छ सीमेजवळळीत विद्याकोट ठाण्यावर कब्जा केला होता. त्यामुळे झालेल्या युद्धात भारताचे 100 सैनिक शहीद झाले होते. त्यामुळे लष्कराच्या दुसऱ्या तुकडीला (10 हजार सैनिक) तीन दिवसांत छारकोटपर्यंत पोहोचणे गरजेचे झाले होते. त्यावेळी रणछोड पगी यांनी लष्कराला मार्द दाखवला होता. त्यामुळेच सैन्याची तुकडी ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी पोहचू शकली होती. युद्ध परिसराची पूर्ण माहिती असलेल्या पगी यांनी परिसरात लपलेल्या 1200 पाकिस्तानी सैनिकांचे लोकेशनही शोधले होते. एवढेच नाही तर, पाक सैनिकांपासून लपून ही माहिती त्यांनी भारतीय लष्करालाही पुरवली होती. ही माहिती भारतीय लष्करासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली होती.

पुढील स्लाइड्सवर वाचा, 1971 च्या भारत-पाक युद्धातील महत्त्वाचे योगदान...
बातम्या आणखी आहेत...