आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएसएफच्या सँड स्कूटर्स नापास; उंट मात्र पास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - सीमा सुरक्षा बल ‘बीएसएफ’ च्या ताफ्यात सामील होण्यासाठी गेले दोन आठवडे परीक्षण सुरू असलेल्या सँड स्कूटर्सची कामगिरी फारशी समाधानकारक नसल्याने उंटांचे श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. वर्षभरापूर्वी अमेरिकी सँड स्कूटर्सही उंटापुढे फिक्या पडल्या होत्या. बंगळुरूच्या मॅनी मॅटिरिअल मूव्हमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या स्कूटर्स बीएसएफच्या ताफ्यात सहभागी होणार होत्या.


उंट ही बीएसएफची ओळख आहे. स्वाराशी उंटाचे भावनिक नाते निर्माण होते. 50 अंश तापमानातही उंट काम करतो. गस्त घालताना जवान अनेकदा रस्ता चुकतात, पण उंट कधीच रस्ता चुकत नाही, असे बीएसएफमध्ये कार्यरत अमोलसिंह राठोड यांनी सांगितले.


30 हजारांचा उंट
बीएसएफकडे राजस्थान व गुजरात सीमेवर 1200 उंट आहेत. उंटाची किंमत 25 ते 30 हजार रुपये असते. उंटाला रोज 10 किलो चारा व 3 किलो दाणा. वार्षिक खर्च सुमारे 35 हजार रुपये.


15 लाखांची गाडी
मॉडेल टीएम 4 टीएम 5
इंजिन 1400 (सीसी) 1000 (सीसी)
आसन 04 02
इंधन 28 लि. डिझेल 26 लि. पेट्रोल
मायलेज 8 किमी/लिटर 8 किमी/लिटर


असे होते निकष
०वाळवंटात घुसखोरांचा पाठलाग करणे
०सशस्त्र जवानास चालू गाडीत चढता-उतरता येणे
०आवाज न करता संशयिताचा मागोवा घेणे
०लांब अंतरावर गस्त घालण्यास सक्षम असणे