आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान बॉर्डरवर कॅमेऱ्यात कैद झाले तीन संशयित, सर्च ऑपरेशन सुरु

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काटेरी तारांची तटबंदी असलेल्या बॉर्डर परिसराता गस्त वाढवण्यात आली आहे. - Divya Marathi
काटेरी तारांची तटबंदी असलेल्या बॉर्डर परिसराता गस्त वाढवण्यात आली आहे.
पठाणकोट - पठाणकोटच्या बमियाल बॉर्डरवर नाइट व्हिजन कॅमेऱ्यात तीन संशयित कैद झाले आहे. त्यानंतर बीएसएफने बॉर्डरवर गस्त वाढवली आहे. त्यासोबतच पंजाबच्या बॉर्डर परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे.

कोणत्या पोस्टवर आढळल्या संशयित हलचाली
- पठाणकोट हल्ल्यानंतर नाइट व्हिजन कॅमेऱ्यात संशयितांचे चेहरे कैद होण्याची ही पहिली घटना आहे.
- बीएसएफच्या टींडा चेकपोस्ट समोर रात्री 3 वाजता तीन संशयित नाइट व्हिजन कॅमेऱ्यात कैद झाले.
- पंजाब पोलिस आणि बीएसएफचे एक पथक सर्च ऑपरेशन करत आहे.