आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BSFला 50 वर्षानंतर मिळाली लेडी ऑफिसर, चित्रपटाचे शुटिंग पाहून उचलली बंदूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीएसएफमध्येही ग्राउंड ड्युटीवर म्हणजेच ऑपरेशनल ड्युटीचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी होणार तनुश्री पारिक - Divya Marathi
बीएसएफमध्येही ग्राउंड ड्युटीवर म्हणजेच ऑपरेशनल ड्युटीचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी होणार तनुश्री पारिक
जोधपूर - सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) 50 वर्षांनंतर कारवाईच्या भूमिकेत प्रथमच महिला अधिकाऱ्याचा प्रवेश होत आहे. हवाई दलाने ज्याप्रमाणे लढाऊ विमान चालवण्यासाठी महिला वैमानिकांना परवानगी दिली आहे, त्याप्रमाणेच बीएसएफमध्येही ग्राउंड ड्युटीवर म्हणजेच ऑपरेशनल ड्युटीचे नेतृत्व महिला अधिकारी करतील. हा ऐतिहासिक गौरव प्राप्त करण्याचा मान राजस्थानमधील बिकानेरच्या तनुश्री पारिक यांना मिळाला आहे.
तनुश्री म्हणाल्या, 'मी चार वर्षांची होती तेव्हा बिकानेरमध्ये बॉर्डर चित्रपटाचे शुटिंग पाहिले होते. त्यात बीएसएफची महत्त्वाची भूमिका होती. चित्रपटातिल काही दृष्य माझ्या डोक्यात पक्के बसले. वडील डॉ. एस.पी.जोशी शुटिंगचे फोटो दाखवून मला प्रोत्साहित करत राहायचे. मग काय तेव्हापासूनच ठरवले की खाकी वर्दीची नोकरी करायची आणि हातात बंदूक घ्यायची.' तनुश्री सांगतात, बिकानेरमध्ये बीएसएफची कार्यपद्धती पाहिली तेव्हा लक्षात आले की ही अशी फोर्स आहे जी 24 तास सेवेत तत्पर असते. मी नोकरीसाठी नाही तर पॅशनसाठी बीएसएफ जॉइन केले. त्या म्हणता, मी फोर्समध्ये येणे तेव्हाच सार्थक होईल जेव्हा इतर मुलीही बीएसएफ जॉइन करतील.

पुढील स्लाइडमध्ये, तनुश्रीचे आणखी फोटोज्..