आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदेव बाबाचे शीर आणा, एक कोटी रुपये मिळवा, बसपा नेत्याची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - दलितांच्या संदर्भात रामदेव बाबा यांनी केलेल्या व्क्तव्यामुळे खवळलेल्या बसपाच्या एका लोकसभा उमेदवाराने त्यांचे शीर आणणा-याला एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. होशियारपूर मतदारसंघाचे बसपा उमेदवार भगवानसिंह चौहान यांनी हे बक्षीस जाहीर केले आहे. चौहान यांनी रविववारी रामदेव बाबा यांच्या पुतळ्याचे दहन करत त्यांनी केलेल्या व्क्तव्याचा निषेध केला. याबाबत त्यांना विचारले असता, ‘ मी माझ्या व्कव्यावर ठाम असल्याचे ते म्हणाले. जर रामदेवबाबा संपूर्ण महिला वर्गाचा अपमान करू शकतात, तर मी असे वक्तव्य का करू शकत नाही', असे वक्तव्य त्यांनी केले.
पक्ष मात्र चार हात लांब
होशियारपूर जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी योग्य कारवाईचे आदेश दिले आहेत. तर, पक्षाने मात्र या वक्तव्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. चौहान यांनी असे वक्तव्य करायला नको होते, असे मत बसपाचे सरचिटणीस नरेंद्र कश्यप यांनी व्यक्त केले. पोलिस अधिक्षक सुशील कुमार यांनी मात्र अशा प्रकारच्या वक्तव्याबाबत माहिती नसल्याचे म्हटले आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे वाचा : आणखी एका वादात अडकले रामदेव बाबा