आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे नेते म्हणाले होते \'वोट के साथ नोट दो\', हत्ती बसवला सत्तास्थानी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ (उत्तर प्रदेश) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर दलित-बहुजनांचे देशात राजकीय वजन वाढवण्याचे काम बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांनी केले. आज कांशीराम यांची जयंती आहे. त्यानिमीत्ताने divyamarahti.com सांगत आहे कांशीराम यांच्याबद्दलची पडद्याआडची माहिती. दलित-बहुजन समाजाच्या जोरावर कांशीराम यांनी उत्तर प्रदेशात कधी सपा तर कधी भाजप आणि स्वबळावर सत्ता मिळवली. यासाठी त्यांनी प्रचारसभांमध्ये 'वोट के साथ नोट दो' असेही आवाहन केले होते.
कुठे म्हणाले होते, वोट के साथ नोट
- कांशीराम यांचा जन्म पंजाबात झाला. तिथेच त्यांचे शिक्षण झाले. त्यांना नोकरी महाराष्ट्रात मिळाली, ती देखिल विद्येचे माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या पुण्यात. संरक्षण खात्यात नोकरीला असतांना त्यांना जातियतेचे चटके बसले. यातूनच त्यांचा आंबेडकर-फुले-पेरियार यांच्या विचारांच्या दिशेने प्रवास सुरु झाला. ते नोकरी करत असलेल्या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यावरुन वाद झाला आणि त्यांनी नोकरी सोडली. त्यानंतर त्यांनी दलित-बहुजनांची एकजूट सुरु केली ती उत्तर प्रदेशात सत्ता मिळवेपर्यंत कायम ठेवली.
- सत्ता हीच सर्व समस्यांची गुरुकिल्ली आहे, हे कांशीराम यांच्या तत्व होते. त्यासाठी निवडणूक लढली पाहिजे. निवडणूक लढून समाज एकजूट केला पाहिजे आणि निवडणूूक लढण्यासाठी पैसा पाहिजे.
- कांशीराम यांनी बामसेफच्या माध्यमातून दलितांमधील शिक्षीत आणि नोकरी करणारा वर्ग एकजूट केला. फंड गोळा करण्यासाठी त्यांनी आवाहन केले की तुम्ही एकवेळचे जेवण द्या. आम्ही तुम्हाला 'आझादी' देऊ. सामाजिक स्वातंत्र्य.
- अलाहाबाद येथील प्रचार सभेत कांशीराम यांनी लोकांना आवाहन केले की तुम्ही मतदान तर नंतर कराल पण त्याआधी तुमच्याकडून पैसा पाहिजे. ते म्हणाले, 'वोट के साथ नोट दो'. त्याचे म्हणणे असायचे की, आम्ही बॅनर आणि इतर साधनांसह विरोधकांचा मुकाबला करु शकत नाही.
- कांशीराम यांनी 500 तरुण पेंटरची फौज तयार केली. हे पेंटर हाताने भिंतींवर हत्तीचे चिन्ह रंगवत होते.
- कांशीराम म्हणत, की हाताने भिंतीवर हत्ती रंगवणे अधिक सोपे आहे. यातून आपण अधिक जागरुकता निर्माण करु शकतो.
- कांशीराम यांनी राजकीय आयुष्याला सुरुवात केल्यानंतर म्हटले होते, मी लग्न करणार नाही. मी स्वतःची संपत्ती निर्माण करणार नाही. मी माझ्या घरी जाणार नाही. उरलेले संपूर्ण आयुष्य फुले-आंबेडकरी चळवळीसाठी समर्पित करीन.
पुढील स्लाइडमध्ये, मायावतींनी केली भारतरत्नची मागणी
बातम्या आणखी आहेत...