आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BSP In Uttar Pradesh, The BJP 'private Settlement' Of Chief Minister Akhilesh Yadav Alleged

उत्तर प्रदेशात बसपाचा भाजपशी ‘गुप्त समझोता’ मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये बसपाने भाजपशी ‘गुप्त समझोता’ केला आहे, असा आरोप मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी बुधवारी केला. बसपाचे सर्व ज्येष्ठ नेते आपापल्या मतपेढ्या घेऊन भाजपमध्ये गेले आहेत, त्यामुळे बसपा सत्ता स्पर्धेत मागे पडला आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
सरकारी निवासस्थानी आयोजित एका कार्यक्रमात अखिलेश म्हणाले की, भाजपमुळेच बसपा आमच्याविरुद्ध आरोप करत आहे. त्यांचा भाजपशी समझोता आहे. आम्ही लोकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहोत. याआधी एवढे काम कोणीही केले नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सपाने आपली मते भाजपकडे वळवली. या मायावतींच्या आरोपाला उत्तर देताना अखिलेश म्हणाले की, सपाचे नुकसान करण्यासाठी बसपानेच असे केले आहे. इतरांचे नुकसान करण्यासाठी स्वत:चेच नुकसान करून घेण्याचीही काही लोकांची तयारी असते.
एका प्रश्नाच्या उत्तरात अखिलेश म्हणाले की, बसपा सत्ता स्पर्धेत मागे पडला असल्याने आमची त्या पक्षाशी कुठलीही स्पर्धा नाही.
बसपाच्या भाईचारा समितीतील सर्व लोक भाजपत गेले आहेत. त्यांची मतेही भाजपत गेली आहेत, पण मायावती लोकांची दिशाभूल करत आहेत. म्हणाले की, काळा पैसा, भ्रष्टाचार आणि बनावट नोटा यावर सर्जिकल स्ट्राइक करण्याबाबत बोलले जाते, पण कॅशलेस अर्थव्यवस्थेबाबत काहीच चर्चा होत नाही.
काँग्रेसशी युती झाली तर सपालाच फायदा
काँग्रेसशी युती करण्याबाबत तुमची भूमिका काय आहे, या प्रश्नावर अखिलेश म्हणाले की, माझी भूमिका स्पष्ट आहे. समाजवादी पक्ष स्वबळावर सरकार स्थापन करणारच आहे, पण काँग्रेसशी युती झाली तर आम्हाला ४०३ पैकी ३०० पेक्षा जास्त जागा मिळतील.
कमकुवतांना पाठिंब्याची गरज
सपा आणि काँग्रेस यांच्या संभाव्य युतीवर टीका करताना बसपाच्या सर्वेसर्वा मायावती म्हणाल्या की, कमकुवतांनाच पाठिंबा हवा असतो. मुलायमसिंह यादव यांचा समाजवादी पक्ष युतीसाठी आतुर झाला आहे. यातून त्या पक्षाची राज्यात वाईट अवस्था झाली हेच स्पष्ट होते.
बातम्या आणखी आहेत...