आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसपा नेत्याची यूपीत गोळी घालून हत्या; अलाहाबाद विद्यापीठातील वसतिगृहाबाहेरची घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2017 च्या विधानसभा निवडणुकीत राजेश यादव बीएसपीचे उमेदवार होते. - Divya Marathi
2017 च्या विधानसभा निवडणुकीत राजेश यादव बीएसपीचे उमेदवार होते.
अलाहाबाद- उत्तर प्रदेशातील अलाहाबादच्या कर्नलगंजमध्ये बहुजन समाज पार्टीचे (बसपा) नेते राजेश यादव यांची गोळी घालून हत्या करण्यात आली. हत्येनंतर संतप्त समर्थकांनी राज्य परिवहनाच्या एका गाडीला पेटवून दिले. बस रिकामी होती. त्यामुळे जीवितहानी टळली. सुरक्षा दलाने जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला.  सायंकाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणात होती.  
भदौहीच्या दुगुणा गावचे राजेश यादव आपले मित्र डॉक्टर मुकुल सिंह यांच्यासोबत कारने अलाहाबाद विद्यापीठाच्या ताराचंद होस्टेलमध्ये कुणाला तरी भेटण्यासाठी गेले होते.
 
वसतिगृहाबाहेर रात्री उशिरा त्यांचा कोणासोबत तरी वाद झाला. त्यादरम्यान गोळीबार झाला. त्यात राजेश गंभीर जखमी झाले. डॉ. मुकुल यांनी त्यांना जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बसपा नेत्याच्या गाडीतही बंदुकीच्या गोळ्या आढळून आल्या आहेत. गाडीवर मागील बाजूने दगड-विटा मारल्याच्या खाणाखुणा दिसून येतात. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. राजेश यांची पत्नी मोनिकाने हत्येच्या मागे डॉ. मुकुल यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. राजेश व मुकुल यांच्यात व्यवसायावरून वाद सुरू होता. त्यातून हत्या झाल्याचे मोनिका यांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीच्या वादातून ही घटना घडल्याचा दावा त्यांनी फेटाळला.  
 
४५  मिनिटांपूर्वी पत्नीशी  झाले होते संभाषण  
राजेश यांचे सासरे श्रीधर यादव म्हणाले, सोमवारी रात्री १ वाजून ४५ वाजता राजेश यांचे पत्नी मोनिकाशी संभाषण झाले होते. घरी पोहोचण्यासाठी एक ते दीड तासाचा वेळ लागेल, असे त्यांनी सांगितले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पहाटे तीन वाजता आम्ही डॉ. मुकुल यांच्या क्लिनिकमध्ये पोहोचलो. तोपर्यंत राजेश यांचा मृत्यू झाला होता, असा यादव यांचे म्हणणे आहे.  
 
बाहुबली आमदाराच्या विरोधात निवडणूक
राजेश यांनी बसपाकडून २०१७ मध्ये संत रविदासनगर भदौहीच्या ज्ञानपूर विधानसभेतून आमदारकीची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. ते बसपाच्या ज्ञानपूर विधानसभेचे प्रभारीदेखील होते.  
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, राजेश यादव यांच्या हत्येनंतर जाळपोळ..   
बातम्या आणखी आहेत...