आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोलकरणीस मारहाण, बसप खासदाराची पत्नी गजाआड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मोलकरणीचा छळ व तिला मारहाण करणार्‍या बसप खासदार धनंजय सिंह यांची पत्नी जागृती हिला अटक करण्यात आली आहे. या मोलकरणीचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशातील जाैनपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार्‍या धनंजयसिंह यांच्या दिल्लीतील साऊथ अव्हेन्यू स्थित सरकारी निवासस्थानात ही महिला काम करीत होती. धनंजय यांची पत्नी जागृती मोलकरणीचा अनन्वित छळ करीत होती. तिच्या हात, पाय आणि छातीवर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या आहेत. मोलकरणीच्या मृत्यूचे कारण कळाल्यानंतर पोलिसांनी खासदार पत्नीला अटक केली. घरातील इतर नोकरांचीही चौकशी सुरू आहे. धनंजय व जागृती यांचा गेल्या सात महिन्यांपासून घटस्फोटाचा खटला सुरू आहे. दोघेही वेगळे राहतात.