आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bsp Party Uses Brahmin Dalit Fifty Fifty Formula In Election

बसपाचा ब्राम्हण-दलित फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्‍युला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशातील 80 जागांसाठी बसपाने आपली 36 उमेवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये ब्राम्हण आणि दलित उमेदवारांना प्रत्येकी 18-18 जागा देण्यात आल्या आहे.

नवरात्र अष्टमी दिनी ब्राह्मण भाईचारा समिती कार्यकारी मंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मायावतींनी गुरुवारी उमेदवारांची यादी जाहीर केली. समाजवादी पार्टीकडून ब्राह्मणांवर अन्याय होत आहे. या समुदायावर अ‍ॅट्रॉसिटीज अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे प्रकार सपाच्या कार्यकाळात वाढले आहेत, असा आरोप करून विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करून न्याय देण्याची मागणी करण्यात आली होती, असे मायावती म्हणाल्या.

मोदी फॅक्टर बिनकामाचा : भाजपकडून मोदी फॅक्टरचा वापर करण्यात येत असला तरी हा फॅक्टर भाजपसाठी बिनकामाचा ठरणार आहे, असे मत मायावतींनी व्यक्त केले आहे.