आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BSP President Mayawati Says PM Narendra Modi For Welfare Of Poor At Lucknow

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या आश्वासनांना देशातील जनता कंटाळली- मायावती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शनिवारी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेला स्वप्न दाखवली होती. परंतु निवडणूक झाल्यानंतर मोदी सरकारला देशातील जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. आता मात्र मोदींच्या मोठ-मोठ्या आश्वासनांना देशातील जनतेला कंटाळा आला असल्याचे मायावतींनी म्हटले आहे.
मोदींनी विदेशातील बॅंकामधील काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले होते. परंतु मोठी सरकारने अद्याप आपले आश्वासन पूर्ण केलेले नाही. त्यामुळे मोदींच्या मोठ-मोठ्या गोष्टी ऐकून आता देशातील जनतेला अक्षरश: वीट आला असल्याचे मायावती म्हटले आहे. विदेशातील भारतीयांचा काळा पैसा परत देशात आणण्यास मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला खोटी आश्वासने देऊन त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप मायावती यांनी केला आहे. परंतु, आता देशातील जनताच मोदी सरकारला जाब विचारताना दिसत आहे.