आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BSP Rajya Sabha MP Narendra Kashyap\'s Daughter In Law Himani Found Dead Under Mysterious Circumstances

हेलिकॉप्टरने झाली होती विदाई, आता डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाझियाबाद/मेरठ - बहुजन समाज पक्षाचे खासदार नरेंद्र कश्यप यांची सून हिमांशी कश्यप यांचा डोक्यात गोळी लागल्याने बुधवारी मृत्यू झाला. गोळी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. ही घटना त्यांच्या घरीच झाली. पोलिसांनी याप्रकरणी नरेंद्र कश्यप यांच्यासह त्यांचा मुलगा सागरला (हिमानीचा पती) अटक केली आहे.

पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, आपल्या मुलीचा हुंड्यासाठी छळ सुरू होता, तिच्याकडे फॉर्च्युनर गाडीची मागणी केली जात होती, असा आरोप हिमांशी हिचे वडील हिरालाल कश्यप यांनी केला आहे. हिरालाल हे बसप सरकारमध्ये मंत्री होते.

हिमांशीच्या वडिलांनी सांगितले की, हिमांशी २५ मार्चला घरी आली होती तेव्हा हुंड्यासाठी आपल्याला मारहाण होत होती, असे तिने सांगितले होते. पती सागर तिचा छळ करत होता. तिच्याकडे सतत फॉर्च्युनर गाडीची मागणी केली जात होती. काही दिवसांपूर्वी सागरने केलेल्या मारहाणीत तिच्या कानाला गंभीर दुखापत झाली होती. कानावर उपचार सुरू होते. पोलिसांनी सांगितले की, हे कौटुंबिक वादाचे प्रकरण असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. हिमांशीने स्वत: गोळी झाडून घेतली की पतीने तिच्यावर गोळी झाडली याचा तपास सुरू आहे. हिमांशीचा पती सागर कश्यप डॉक्टर असून तो दिल्लीच्या बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात काम करतो.

राजकीय घराण्याची कन्या...
- हिमानी एका राजकीय घराण्याची कन्या होती. हिमानीचे वडीलांनी बसप सरकारच्या कार्यकाळात मंत्रीपद भूषवले होते.
- सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, हिमानीने बाथरुममध्ये स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.
- हिमानीला पती सागर यांनी यशोदा हॉस्पिटलमध्ये हलवले. डॉक्टरानी तपासून मृत घोषित केले.
- हिमानीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
- सागर व हिमानीला एक मुलगा आहे.
- हिमानीचे पती सागर मेरठमध्ये डॉक्टर आहेत.

2013 मध्ये झाला होता विवाह
- हिमानी व डॉ.सागर कश्यप यांचा विवाह 27 नोव्हेंबर 2013 झाला होताे.
- हिमानीचे शिक्षण यूपीच्या बदायूंमध्ये झाले.
- हिमानीचे पती सागर डॉक्टर असून दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल अॅण्‍ड मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत आहे.

काय म्हणाले पोलिस?
- गाझियाबादचे एसएसपी धर्मेंद्र यादव यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे .
- दुसरीकडे, यशोदा हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितले की, डॉ. सागर कश्यप यांनी बुधवारी सकाळी 11 वाजता हिमानीला हॉस्पिटलमध्ये आणले. मात्र, तो पर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

पुढील स्लाइडवर वाचा, हिमानीच्या वडिलांनी जावयावर केला हुंडा मागितल्याचा आरोप...