आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक मतपत्रिकेने घ्या, भाजप जिंकू शकणार नाही- मायावती; ईव्हीएमवरून पुन्हा वाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बहाण्याने पुन्हा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरून (ईव्हीएम) वाद सुरू झाला आहे. निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती म्हणाल्या, २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतपत्रिकेचा वापर झाला तर भाजप जिंकू शकणार नाही. दुसरीकडे, भाजपने या निवडणुकीत घोळ केला, त्याकडे निवडणूक आयोगाने डोळेझाक केली, असा आरोप समाजवादी पार्टीनेही केला अाहे. 


यूपीत महापौर निवडणुकीत १६ पदांपैकी १४ पदे भाजपने जिंकली. दोन पदे बसपला मिळाली. मायावती म्हणाल्या, भाजपने निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा वापर केला आहे. अन्यथा बसपने आणखी पदे जिंकली असती. लोकशाहीवर विश्वास असेल तर २०१९ च्या निवडणुकीत मतपत्रिकेने मतदान घेऊन दाखवा, असे आव्हानही त्यांनी दिले.

 

ईव्हीएम केंद्रांवर भाजपला ४५% मतदान, मतपत्रिकेच्या ठिकाणी १४.८५%
भाजपने १९८ नगरपालिकांत ७० व ४३८ नगर पंचायतींत १०० जागा जिंकल्या. निवडणुकीत मतदानासाठी ईव्हीएम व मतपत्रिकेचा वापर झाला. ज्या वॉर्डांमध्ये ईव्हीएमने मतदान झाले तेथे भाजपने ४५.८५% आणि मतपत्रिकेचा वापर झालेल्या वार्डांत १४.८५% यश मिळाले. 

 

सपचा दावा : दोन पालिकांतील बसपचा विजय हा प्रायोजितच
निवडणुकांत भाजपने घोळ केल्याचा आरोप समाजवादी पार्टीने केला आहे. कोलकात्यात अखिलेश यादव म्हणाले, आपण भाजपची पोलखोल करणार आहोत. लखनऊत पक्षाध्यक्ष उत्तम पटेल म्हणाले, निष्पक्ष मतदानाबद्दल सुप्रीम कोर्टाच्या अादेशाकडे निवडणूक आयोगाने डोळेझाक केली. ईव्हीएममध्ये व्हीव्हीपॅट लावले नाही. २ पालिकांतील सपचा विजय प्रायोजित आहे. सर्व जागा भाजपने जिंकल्या असत्या तर त्यांचे पितळ उघडे पडले असते.  यामुळे जाणूनबुजून दोन जागा बसपला दिल्या. 

 

चिदंबरम म्हणाले : २८% पदांवरील विजय ‘माेठा’ असेल तर व्याख्या बदला
काँग्रेस नेते पी. चिदंबरम म्हणाले, यूपी पालिका निवडणुकांत २८% पदे जिंकणे हा भाजपचा स्वीप (मोठा विजय) असेल तर ऑक्सफोर्ड व वेबस्टर शब्दकोशांतील त्यांच्या व्याख्या बदलल्या पाहिजे. काँग्रेसनेही भाजपच्या विजयावर शंका घेतली आहे.

 

भाजपने आरोप फेटाळले

यूपीचे भाजप प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडेय म्हणाले, पराभवाची नामुष्की झाकण्यासाठी विरोधी पक्षा अपप्रचार करत आहेत. बसपने जिंकलेल्या दोन महापौरपदाच्या निवडणुकीतही ईव्हीएमचाच वापर केलेला होता. सरकारी यंत्रणांचा गैरवापर ही बसप, सप व काँग्रेसचीच संस्कृती असल्याचे पांडेय म्हणाले. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...