आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bsp Supremo Mayawati Birthday Celebration In Uttar Pradesh

मायावतींच्या वाढदिवशी कार्यकर्त्यांनी लुटला केक, ज्याच्या हातात जेवढा मावेल तेवढा त्याने घेतला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरठ / मुझफ्फरपूर - बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती आज 60वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमीत्ताने बसपाच्या कार्यकर्त्यांनी मेरठ आणि मुजफ्फरनगर येथे केक कापला. दोन्ही ठिकाणी केक कापल्यानंतर कार्यकर्त्यांची झुंबड उडाली आणि ज्याच्या हाती जेवढा केक आला तो तेवढा घेऊन पुढे निघाला.

मेरठमध्ये वाढदिवसाच्या कार्यक्रमात गोंधळ
- मेरठमधील आंबेडकर कॉलेजमध्ये मयावतींच्या वाढदिवसानिमीत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला विभागीय समन्वयक आणि जिल्ह्यातील पाच विधानसभा उमेदवार उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी नेत्या मायावती यांच्या 60व्या वाढदिवसानिमीत्त 60 किलोचा केक मागवला होता.
- कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले होते. यामुळे रस्ता जाम झाला. कार्यक्रमस्थळी मायावतींना शुभेच्छेचे होर्डिंग आणि पोस्टर लावण्यात आले होते. कार्यक्रमानंतर कार्यकर्ते ते सोबत घेऊन गेले. आपल्या नेत्याच्या वाढदिवसाच्या केकचा आस्वाद घेण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाली यात काहींचे कपडेही भरले.

मुझफ्फरनगरमध्ये जमीनीवर पडला केक
मुझफ्फरनगरमध्ये महावीर चौकातील राजकीय इंटर कॉलेजमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बसपा खासदार कादिर राणा उपस्थित होते. राणा यांनी केक कापताच कार्यकर्ते मंचाच्या दिशेने धावले, काही सेकंदातच केक मंचावरुन जमीनीवर पडला.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, फोटोज्...