आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BSP Supremo Mayawati Escapes From Plane Accident News In Divya Marathi

बसपा प्रमुख मायावती थोडक्यात बचावल्या, विमानाचे लॅँडिंग होताना चाक अडकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - विमान उतरवण्यात येत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे होत असलेला अपघात टाळण्यात वैमानिक यशस्वी झाल्यामुळे बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती थोडक्यात बचावल्या.

लखनऊ विमानतळावर ही घटना घडली. महाराष्ट्रातील प्रचार दौरा आटोपून मायावती रविवारी लखनऊला माघारी परतल्या. त्या वेळी त्यांचे भाडोत्री विमानाचे लँडिंग होत असताना धावपट्टीजवळ आल्यावर विमानाचे पुढील चाक अडकले. त्यामुळे वैमानिकाला चाकांचे साह्य न घेता ‘बेली लँडिंग’प्रमाणे प्रयत्न करणे भाग पडले. त्या प्रयत्नात वैमानिक अखेर यशस्वी ठरला. दरम्यान, वैमानिकाने या बिघाडाबाबत हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला कळवताच ताबडतोब अग्निशामक, सुरक्षा रक्षक आणि रुग्णवाहिका धावपट्टीजवळ तैनात करण्यात आल्या होत्या. विमानात मायावती यांच्यासोबत त्यांचे निकटचे सहकारी आणि राजकीय रणनीतीकार एस.सी. मिश्रा होते.