आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PM मोदी भावूक होऊन देशाला ब्लॅकमेल करत आहेत, BSP सुप्रीमो मायावतींचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी नोटबंदीचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत मायावतींनी भाजप, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना उत्तर प्रदेशमध्ये संधी नसल्याचा दावा केला आहे. नोटबंदीच्या फसलेल्या निर्णयानंतर पंतप्रधान वेळोवेळी भावूक होऊन देशातील जनतेला ब्लॅकमेल करीत असल्याचे मायावती म्हणाल्या.
काय म्हणाल्या मायावती
- समाजवादी पक्षाने अर्धवट तयार लखनऊ-आग्रा हायवेचे उद्घाटन करुन त्यांच्या अर्धवट ज्ञानाचे प्रदर्शन केले आहे.
- ऑक्सिजनवर चालणारी काँग्रेस धोक्यात आहे.
- उत्तर प्रदेशातील मुस्लिम बहुजन समाज पक्षासोबत असल्याचा दावा, मायावतींनी केला आहे.
- उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा धोका बहुजन समजापक्षाकडूनच आहे. त्यामुळेच ते आमच्या पक्षाला टार्गेट करीत आहेत.
- भाजपच्या चुकीच्या धोरणावर फक्त बसप प्रहार करीत आहे.
- बहुजन समाज पक्ष आपला पक्ष निधी भाजपसारखा पेटीत बंद करुन ठेवत नाही, तर पक्षाच्या कामासाठीच खर्च केला जातो.
- केंद्र सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णायाचा बसप संसदेत आणि संसदेबाहेर आवाज उठवत आहे. कारण, हा निर्णय गरीब, कष्टकरी आणि शेतकऱ्यांना त्रासदायक ठरलेला आहे.
- नोटबंदीच्या फसलेल्या निर्णयानंतर मोदींचे वेळोवेळी भावूक होणे जनतेला इमोशनल ब्लॅकमेल करण्यासारखे आहे.
बातम्या आणखी आहेत...