आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BSP ने जाहीर केली 100 उमेदवारांची तिसरी यादी, 25% मुसलमानांना तिकिट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मायावती - Divya Marathi
मायावती
लखनऊ- बहुजन समाज पक्षाच्या सुप्रिमो मायावती यांनी शनिवारी 100 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यात उन्‍नाव, रायबरेली, अलाहाबाद, झांसी, गोंडा, फैजाबाद, बहराइच सारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे. यादीत 25 टक्के मुसलमान उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहेत. बसपने जाहीर केलेली ही तिसरी यादी आहे.

बसपने आतापर्यंत एकूण 300 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या आणि दुसर्‍या यादीत 100-100 नावे होते. बसपने आतापर्यंत 28 टक्के मुसलमान उमेदवारांना उमेदवारी दिली आहे.

दुसर्‍या यादीत 29 टक्के अगडी जातीच्या उमेदवारांचा समावेश... 
- बसपने शुक्रवारी 100 उमेदवारांची यादी जाहीर केली होती 
- यात जवळपास 30 टक्के (59 उमेदवार) मुस्लिम समाजाचे आहेत तर दुसर्‍या यादीत लखनऊ, इटावा, मैनपुरी, रामपूरसह अनेक जिल्ह्यांतील उमेदवारांचा समावेश आहे. 
- दुसर्‍या यादीत 29 टक्के अगडी जातीच्या तर 23 टक्के ओबीसी उमेदवारांचा समावेश आहे.  

पहिल्या यादीत 23 टक्के ब्राह्मण उमेदवार... 
- बसपने गुरुवारी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत 23 ब्राह्मण, 36 मुसलमान, 16 दलित आणि 3 महिलांचा समावेश आहे. यात 7 उमेदवार असे आहेत की, त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. 
- यादीत 25 नावे नवीन आहेत. 22 विद्यमान आमदारांना दुसर्‍यांना संधी देण्यात आली आहे. 
- 10 आमदारच्या मतदार संघात नवे चेहरे निवडणूक लढणार आहे.

मुसलमानांना सर्वाधिक तिकीटे...
- मिळालेली माहिती अशी की, बसप पुन्हा एकदा सोशल इंजिनियरिंग फॉर्म्युला वापरताना दिसत आहे. 300 उमेदवारांमध्ये 84 मुसलमान नागरिकांचा समावेश आहे. 
- पहिल्या यादीत 23 ब्राह्मणांचा समावेश आहे. यात सर्वाधिक चर्चित नाव माजी मंत्री रामवीर उपाध्याय यांचा समावेश आहे. त्यांना यावेळी हाथरसमधील सादाबाद येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

पुुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, बसपने जाहीर केलेली उमेदवारांची तिसरी यादी... 40 टक्के जागांवर नेत्यांचा मुले, नातू, पत्नीसाठी तिकिटाचा आग्रह

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...