आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2004 ची पुनरावृत्ती होणार नाही ही अपेक्षा : बुद्धदेव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता -2004 सारख्या परिस्थितीची या वेळी पुनरावृत्ती होणार नाही, अशी अपेक्षा माकप नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांनी व्यक्त केली आहे. त्या वेळी काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीएला माकपला पाठिंबा द्यावा लागला होता. ते म्हणाले की, यूपीएऐवजी एनडीएचे सरकार म्हणजे आगीतून निघून फुपाट्यात पडण्यासारखेच आहे.‘आम्ही सर्वशक्तिनिशी भाजपला रोखण्याचा प्रयत्न करू पण याचा अर्थ आम्ही काँग्रेसच्या नव उदारमतवादी धोरणांचे स्वागत करतो, असा अजिबात नाही. जनतेने त्यांना नाकारले आहे. त्यांनी दोन भारताचे ‘निर्माण’ केले आहे... एक श्रीमंतांसाठी आणि दुसरा गरिबांसाठीचा भारत’.