आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Buddhist Monk Pragyanand Who Given Initiation Of Dhamma To Ambedkar Admit In Kgmu Hospital

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या भिक्खूंनी बाबासाहेबांना दिली होती बौद्ध धम्माची दीक्षा; प्रकृती चिंताजनक झाल्याने रुग्णालयात दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धम्माची दीक्षा देणारे बौद्ध भिक्खू प्रज्ञानंद (90) यांना रविवारी किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी (केजीएमयू) च्या ट्रॉमा सेंटरच्या मेडिसिन वॉर्डमध्ये अॅडमिट करण्यात आले आहे. छातीत दुखणे आणि श्वास घेण्यात अडथळा होत असल्याने त्यांना अॅडमिट करण्यात आले. चेकअपनंतर सोमवारी सकाळी त्यांना गांधी वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. 

 

डॉ. आंबेडकरांना दिली होती भिक्खू प्रज्ञानंद यांनी दीक्षा
- बौद्ध भिक्खू प्रज्ञानंद यांचा जन्म श्रीलंकेत झाला होता. 1942 मध्ये प्रज्ञानंद भारतात आले. महस्थवीर चंद्रमणी यांच्यासह 14 ऑक्टाेबर 1956 रोजी नागपूरमध्ये  सात भिक्खूंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. यात भिक्खू प्रज्ञानंद यांचाही समावेश होता.
- त्यांची देखभाल करणारे भन्ते सुमन म्हणाले- गुरू प्रज्ञानंद मागच्या दोन वर्षांपासून अंथरुणाला खिळलेले आहेत. त्यांना श्वासात अडथळ्यासह मल्टिपल डिसीज आहेत. तीन दिवसांपासून प्रज्ञानंद यांनी अन्न घेतलेले नाही. यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
- प्रज्ञानंद लखनऊच्या रिसालदार पार्कमधील बुद्ध विहारात राहतात. बाबासाहेबांनी या बुद्ध विहाराला दोन वेळा भेट दिली होती.

 

रुग्णालयाचे म्हणणे...
- केजीएमयूचे सीएमएस डॉ. एस. एन. शंखवार म्हणाले- बौद्ध भिक्खू प्रज्ञानंद यांना रविवारी छातीत तीव्र वेदना, श्वास घेण्यात अडथळा होऊ लागल्यानंतर ट्रॉमा सेंटरमध्ये अॅडमिट करण्यात आले होते.
- ट्रॉमा सेंटरच्या डॉक्टरांनी त्यांचे चेकअप केले. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.

 

14 ऑक्टोबर 1956 रोजी दिली होती दीक्षा 
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता. 1950 ते 1956 दरम्यान त्यांच्यावर काही बौद्ध भिक्खूंचा प्रभाव पडला आणि त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरमध्ये आपल्या पत्नीसह तसेच हजारो अनुयायांसह बौद्ध धम्माचा अंगीकार केला होता.

बातम्या आणखी आहेत...