आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Budhagaya Temple Serial Blasts Issue BJP President Rajnathsingh Meet Today

बुद्धगया ब्लास्ट : सहा संशयितांचे चेहरे उघड, एका महिलेने पेरले होते बॉम्ब

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुद्धगया/पाटणा- बिहारमधील महाबोधी विहाराच्या परिसरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेवरून राजकारण चांगलेच तापले असताना नवे खुलासे समोर आले आहेत. बिहार पोलिसांना मंदिरात लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सहा संशयित चेहरे दिसले आहेत. याच संशयितांनी मंदिरात बॉम्ब पेरुन ठेवल्याचा दावा बिहार पोलिसांनी केला आहे.

विशेष म्हणजे यात एका महिलेचा समावेश आहे. परंतु संशयितांची ओळख अद्याप पटलेली नाही. तिघांची ओळख पटवण्‍यासाठी पथके रवाना करण्‍यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. तसेच पोलिसांनी याबाबत सहा जणांना नोटीस बजावली आहे. हे सहा जण महाबोधी मंदिरातच काम करणारे आहेत. साखळी स्‍फोटानंतर हे सर्व बेपत्ता आहेत.

यापूर्वी पो‍लिसांनी विनोद मिस्त्री या संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले होते. मंदिर परिसरात मिस्त्रीचे ओखळपत्र सापडले होते. विनोदने चौकशीत सांग‍ितले, की त्याचे ओळखपत्र गेल्या तीन दिवसांपासून हरवले आहे. विनोद हा गया जिल्ह्यातील बाराचट्टी ब्लॉकमधील रहिवासी असून तो सायकल दुरुस्तीचे काम करतो.

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) याप्रकरणी इंडियन मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांची चौकशी केली. त्यातील एक दिल्ली येथील तिहार तुरुंगात तर दुसरा पुण्यातील तुरुंगात कैद आहे.

दरम्यान, रविवारी पहाटे बुद्धगयेतील महाबोधी मंदिर परिसरात नऊ साखळी बॉम्बस्फोट झाले होते. यात दोन बौद्ध भिक्खू जखमी झाले होते.


पुढील स्लाईडमध्ये वाचा, बुद्धगया येथे पोहोचले भाजपचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष राजनाथ सिंह