आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायजेरियन अध्यक्षांचे तामिळनाडूत प्रशिक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अबुजा - नायजेरिया या आफ्रिकेतील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशात अध्यक्षपदासाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी झालेले मुहंमदू बुहारी यांनी लष्करी शिक्षण भारतात घेतले आहे. तामिळनाडूतील वेलिंग्टनमध्ये असलेल्या इंडियन डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे ते विद्यार्थी आहेत.
१९७३ मध्ये त्यांनी या कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. १७ डिसेंबर १९४७ रोजी जन्मलेले बुहारी १९६१ मध्ये नायजेरियाच्या लष्करात दाखल झाले होते. नंतर त्यांनी भारत, ब्रिटन या देशांत लष्करी प्रशिक्षण घेतले. बुहारी हे नायजेरियाचे लष्करी हुकूमशहा होते. मात्र, १९९९ मध्ये देशातील लष्करी राजवट संपुष्टात आली आणि गुडलक जॉनाथन यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी सत्तेत आली.
तेव्हापासून आजवर म्हणजे सुमारे १६ वर्षे जॉनाथन यांनी देशावर अधिराज्य गाजवले. नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बुहारी यांच्या पक्षाला प्रचंड बहुमताने विजय मिळाला. देशात प्रथमच एखाद्या विरोधी पक्षनेत्याला लोकांनी निवडून दिले आहे. १९९९ पासून गेल्या निवडणुकीपर्यंत बुहारी यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. या वेळी मात्र त्यांनी शिस्तबद्ध प्रचार करून लोकांच्या भावनेला हात घातला. यामुळे विद्यमान अध्यक्ष जॉनाथन यांना २५ लाख मतांनी पराभव पत्करावा लागला.
जनमानसाचा चेहरा

नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बुहारी यांना १५ लाख ४२ हजार मते पडली. एकूण ५३ टक्के मते पडली. जॉनाथन यांना १२ लाख ८५ हजार मतांवर समाधान मानावे लागले. निवडणूक आयाेगाने बुधवारी ही घोषणा केली. दरम्यान, ७२ वर्षीय बुहारी यांनी १९८० च्या दशकात लष्करशहा म्हणून अल्पकाळ सत्ता गाजवली होती; परंतु नंतर त्यांनी लोकशाही मूल्यांचा स्वीकार करून राजकीय मार्ग बदलला होता.