आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिमल्यात परिवहनची इमारत काेसळून 4 ठार, तर 6 जण गंभीर जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुर्घटनेत सहा जण जखमी झाले. जोरदार पावसामुळे बिल्डिंग पडली. - Divya Marathi
दुर्घटनेत सहा जण जखमी झाले. जोरदार पावसामुळे बिल्डिंग पडली.
सिमला - हिमाचल प्रदेशातील सिमल्यापासून ३० किमी अंतरावर असलेल्या ठियोगनगर बसस्थानकाची इमारत शुक्रवारी कोसळली. या दुर्घटनेत परिवहन महामंडळाचा कर्मचारी रोशन वर्मा यांच्यासह चार जण जागीच ठार झाले, तर ६ जण गंभीर जखमी आहेत.  
 
ही दुर्घटना घडली तेव्हा या बसस्थानकात महामंडळाच्या कर्मचाऱ्यांबरोबरच काही प्रवासीही होते. ही इमारत दोन वर्षांपूर्वीच धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले होते.अचानक इमारत कोसळल्याने लोकांमध्ये धावपळ उडाली. स्थानिक लोकांच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. काही वेळातच तेथे अग्निशमन दलाचे जवान जेसीबी यंत्रासह पोहोचले. मृतांपैकी एकाची ओळख पटलेली नाही. 
 
जखमींना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. मलब्याखाली दबलेल्यांचा शोध सायंकाळी उशिरापर्यंत घेण्यात येत होता. या कार्यात एनडीआरएफ आणि इतर सुरक्षा दलांचा सहभाग आहे. 
बातम्या आणखी आहेत...