आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढिगाऱ्याखालून तीन वर्षांच्या चिमुरडीस जिवंत बाहेर काढले; सात जणांचा मृत्यू, 3 जवान जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - शहरातील इजीपुरा भागात सोमवारी सकाळी दोन मजली इमारत कोसळून सात लोक ठार झाले.  या दुर्घटनेत दोन लहान मुले आश्चर्यकारकरीत्या बचावली आहेत. यापैकी तीन वर्षांची मुलगी संजना आहे. तिच्या आईवडिलांचा यात मृत्यू झाला. कर्नाटकचे विकास मंत्री के. जे. जॉर्ज यांनी संजनाला सरकार दत्तक घेत असल्याचे जाहीर केले.  

संजनाच्या पालनपोषणाचा सर्व खर्च सरकार करणार आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ७ च्या सुमारास एक मोठा आवाज झाला. यामध्ये २० वर्षे जुनी इमारत कोसळल्याचे समजले. 

गॅस सिलिंडर स्फोटाची शक्यता
ही दुर्घटना स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलिंडरचा स्फाेट झाल्याने घडली असावी, अशी शक्यता आहे. गृहमंत्री रामालिंगा रेड्डी यांनी सांगितले, इमारतीच्या मैदानावर आणि पहिल्या मजल्यावर सिलिंडर ठेवले होते. यात गॅस भरलेला नव्हता. यामुळे अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. इमारतीत चार कुटुंबे भाड्याने राहतात. ज्या दोन महिलांचा मृत्यू झाला त्या पहिल्या मजल्यावर राहत होत्या. या दुर्घटनेची चौकशी करण्यात येत आहे. 
बातम्या आणखी आहेत...