बुलंदशहर/ मेरठ (उत्तर प्रदेश) - बुलंदशहरच्या जिल्हाधिकारी बी. चंद्रकला यांचा एक व्हिडिओ सध्या राज्यात चर्चेचा विषय झाला आहे. सोशल साइट्सवर देखील हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जिल्हाधिकारी बी. चंद्रकला बुधवारी शहरातील विकास कामाची पाहाणी करत होत्या, तेव्हा त्यांना त्यात झालेला भ्रष्टाचार दिसून आला. विकास कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेले आणि कामात अनियमीतता पाहिल्यानंतर जिल्हाधिकार्यांचा पारा चढला आणि त्यांनी पालिकेच्या अधिकार्यांसह लोकप्रतिनीधींना रस्त्यावरच फटकारले.
जिल्हाधिकारी बी. चंद्रकला यांच्या कामाचे कौतूक सर्वस्तरातून होत आहे. स्थानिकांमध्ये तर, त्यांच्याच कामाची चर्चा ऐकायला मिळत आहे. त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात मोर्चा उघडला असल्याच्या सर्वसमान्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. बुधवारी चंद्रकला या अचानक पालिकेच्या विकास कामांची पाहाणी करण्यास निघाल्या. यावेळी त्यांनी पाहिले की, रस्त्यांच्या कामासाठी जे गट्टी लावण्यात आले ते निकृष्ट दर्जाचे आहेत. तसेच कामासाठी वापरण्यात आलेले साहित्य हे जूने असून ते रि-यूज केले जात आहे.
निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे पाहून जिल्हाधिकारी चंद्रकला यांनी तिथे उपस्थित अधिकार्यांना फैलावर घेतले. त्यासोबतच पालिकेच्या अध्यक्षांनाही जनतेचा पैसा असा वाया घालवता का, असा सवाल केला. या विकास कामांची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यासोबतच साहित्याचा पूरवठा करणाऱी कंपनी आणि कंत्राटदारालाही त्यांनी फटकारले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, जिल्हाधिकारी चंद्रकला फटकारले अधिकार्यांना