आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलंदशहर गँगरेप: मुलगी म्हणाली- IAS व्हायचे, दोषींना स्वतः फाशी देण्याची आईची इच्छा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांनी या प्रकरणी सलीम बावरिया गँगच्या तीन गुंडांना अटक केली आहे. मात्र सलीम त्यांच्या हातात आला नाही. - Divya Marathi
पोलिसांनी या प्रकरणी सलीम बावरिया गँगच्या तीन गुंडांना अटक केली आहे. मात्र सलीम त्यांच्या हातात आला नाही.
लखनऊ / बुलंदशहर - उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये पाच दिवसांपूर्वी झालेल्या गँगरेपमधील पीडित आई आणि मुलीला नेत्यांच्या आश्वासनांवर विश्वास राहिलेला नाही. महिलेने आरोपींना स्वतःच्या हाताने फाशी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर, महिलेच्या मुलीने म्हटले आहे की तिला आयएएस अधिकारी होण्याची मनिषा आहे. 30 जुलैच्या रात्री महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार झाला होता. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
'आरोपींना स्वतःच्या हाताने फाशी दिल्याशिवाय शांतता नाही'
- बुधवारी विविध पक्षाच्या जवळपास अर्धा डझन नेत्यांनी व्हिक्टिम्सची भेट घेतली. मीडियाचे लोकही त्यांच्या घराबाहेर तळ ठोकून होते.
- 35 वर्षीय पीडित महिला माध्यमांशी बोलताना म्हणाली, 'आम्हाला न्याय हवा आहे. आरोपींना स्वतःच्या हाताने फाशी दिल्याशिवाय मला शांतता लाभणार नाही. नेत्यांवर माझा जराही विश्वास नाही. मला माझ्या मुलीचे भविष्य सुरक्षीत करायचे आहे.'
- महिलेने पोलिस आणि सरकारच्या भूमिकेवरही शंका उपस्थित केली. ती म्हणाली, 'घटनेला चार दिवस झाल्यानंतरही सर्व आरोपींना अटक झालेली नाही. आतापर्यंत फक्त तिघांना पकडण्यात आले आहे. मीडियाने दिलेल्या सपोर्टबद्दल धन्यवाद.'

मुलीची आयएएस अधिकारी होण्याची इच्छा
- गँगरेपची शिकार झालेली अल्पवयीन मुलगी सध्या 9 वीत आहे. गेल्या वर्षी तिला 86% मार्कस् मिळाले होते.
- मोठे होऊन तिला आयएएस अधिकारी होण्याची इच्छा आहे.
- या घटनेनंतर तिला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

मुख्य आरोपीवर बक्षिस
- पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. मात्र गँगचा मुख्य सुत्रधार सलीम बावरिया अजून पकडला गेलेला नाही.
- पोलिसांनी त्याच्यावर 15 हजारांचे बक्षीस जाहिर केले आहे.
> पुढील स्लाइडमध्ये वाचा, पीडितेने सांगितलेली आपबीती
> पाहा व्हिडिओ, लेडी डॉक्टरने सांगितली महिलांची अवस्था

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...