आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैल चढला 50 फूट उंच टाकीवर, उतरवण्यास लागले 8 तास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाण्याच्या टाकीवर जाऊन बसला बैल. - Divya Marathi
पाण्याच्या टाकीवर जाऊन बसला बैल.
सिकर (राजस्थान) - पाण्याच्या टाकीवर चढून मागण्या मान्य करुन घेणारे तुम्ही खूप पाहिले असतील. या तमाशाची सुरुवात शोले चित्रपटापासून झाली हे माहित नाही असा चित्रपट प्रेमी शोधूनही सापडणार नाही. कधी एखादा दारुडाही पाण्याच्या टाकीवर चढून आपल्या मागण्या मान्य करुन घेताना तुम्ही पाहिला असेल. पण राजस्थानमधील रतनगढ येथे एक बैल पाण्याच्या टाकीवर चढला आणि त्याला खाली उतरवताना लोकांसह प्रशासनाच्या नाकीनऊ आले.

- रतनगढमधील सर्वात उंच पाण्याच्या टाकीवर बैल चढला होता
- बैल टाकीवर गेल्यानंतर लोकांचे त्याच्याकडे लक्ष्य गेले आणि मग त्याला पाहाण्यासाठी एकच गर्दी झाली.
- गोलाकार पायऱ्यांवरुन बैल कसा उतरणार असा प्रश्न सर्वांनाच सतावू लागला.
- त्याला सुरक्षीत खाली उतरवण्यासाठी लोकांचे प्रयत्न सुरु झाले. मात्र तो कोणाचे काही ऐकण्यास तयार नव्हता.
- जसजशी लोकांची गर्दी वाढू लागली तसा बैल टाकीच्या चारही बाजूंनी फिरु लागला.
- पायऱ्यांवरुन बैल खाली येत नाही हे लक्षात आल्यानंतर लोकांनी क्रेनचा पर्याय पुढे केला.
- नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना संपर्क करुन क्रेन मागवण्यात आले.
- मात्र जागा अपूरी असल्याने क्रेन पूर्णपणे काम करु शकत नव्हते.
- बैलाला खाली उतरवण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरु लागले तशी गर्दीही ओसरु लागली होती.
अखेर असा उतरला बैल
- कोणत्याही प्रयत्नाला यश येत नाही असे दिसू लागल्यानंतर रात्री आठ वाजता डॉक्टरला बोलावण्यात आले.
- त्यांनी बैलाला बेशुद्धीचे इंजेक्शन दिले. त्यानंतर टाकी जवळील विद्यूत खांबाचा विद्यूत पुरवठा खंडीत करण्यात आला.
- बेशुद्ध पडलेल्या बैलाला लोरिंग मशिनच्या मदतीने बेल्टला बांधून खाली उतरवण्यात आले.
- यावेळी नगर पालिका आणि वन विभागाचे अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कसे उतरवलेले बैलाला
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...