आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Semen विक्रीतून हा \'युवराज\' मालकाला रोज कमावून देतो २ लाख रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरियाणा - येथील कर्मवीर यांचा युवराज नावाचा रेडा रोज सुमारे दोन लाखापेक्षा अधिक कमाई करत असल्याचे समोर आले आहे. त्याच्या Semen(वीर्य) विक्रीतून ही कमाई होते. त्यामुळेच सात कोटींची बोली लागूनही त्यांनी या मुर्रा जातीच्या रेड्याचा सौदा केलेला नाही. युवराजच्या खाण्यापिण्यावर दररोज सुमारे दोन हजार रुपयांचा खर्च केला जातो.

युवराजची लांबी 14 फूट तर उंची 5 फुट 9 इंच आहे. काही लोकांनी 7 कोटी रुपयांपर्यंत युवराजची बोली लावली होती. त्यावरूनच त्याची क्रेझ दिसून येते. मालक कर्मवीर मलिक यांनी मात्र युवराजला विकले नाही. युवराजला सख्ख्या मुलाप्रमाणे वाढवले असल्याचे कर्मवीर सांगतात. त्याच्या मोबदल्यात पैसा प्रिय नसल्याचेही ते म्हणतात. कर्मवीर यांनी दिलेल्या माहितीनुसार युवराजच्या माध्यमातून त्यांना दरवर्षी सुमारे 50 लाख रुपये कमाई मिळते. त्याशिवाय या रेड्याचे हाय क्वालिटी सीमेन विक्री करूनही ते लाखो रुपये कमावतात.

कर्मवीर यांनी सांगितले की, युवराज दररोज सुमारे 20 लीटर दूध पितो. त्याशिवाय त्याला 15 किलो चारा आणि 5 किलो सफरचंद लागतात. त्याला दररोज 4 किमी फिरवले जाते. त्याच्यावर दररोज सुमारे दोन हजार रुपये खर्च केले जात असल्याचे ते सांगतात. चंदिगडच्या एका शेतक-याने मला युवराजसाठी 7 कोटी रुपये देऊ केले होते. पण मी त्याला विकू शकेल असे वाटत नसल्याचे कर्मवीर म्हणाले.

सरदार वल्लभ भाई पटेल कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ रवींद्र सांगवान यांच्या मते, युवराज मुर्रा प्रजातीचे एक आदर्श उदाहरण आहे. त्याच्या शरीरात दररोज चांगल्या दर्जाचे 3 ते 5 मिली सीमेन (वीर्य) तयार होते. त्याला डायलूट करून 35 मिली केले जाते. सांगवन यांच्या मते, मुर्रा म्हणशीला गर्भधारणेसाठी 0.25 मिमी सीमेनचा एक डोस वापरला जातो. त्याची किंमत 1500 रुपये असते. तसा हिशेब लावल्यास या रेड्याचा मालक दररोज सुमारे 2 लाख 10 हजार रुपये कमावतो. सांगवान यांच्या मते युवराजच्या सीमेनला संपूर्ण उत्तर भारतात मागणी आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, युवराजचे PHOTO आणि अखेरच्या स्लाइडवर पाहा, VIDEO